Bharat Bondre Passes Away News : राज्याचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे भारत भाऊ बोंद्रे यांचे वयाच्या ८४ व्या निधन झाले आहे. १९६७ पासून ते शरद पवारांसोबत होते.
बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी विरोधी आघाडी महाविकास आघाडी (MVA) मधील मतभेदांच्या चर्चा फेटाळून लावल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी आहेत.
Buldhana Illegal Mineral Transport : अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ४७ टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी १० लाखांहून अधिक दंड वसुल केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीने सुरू केलेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी अडीच लाख रुपये पगाराची नोकरी सोडून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढा दिला. पण या सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा आणि निळ्या रंगात विभाजित केले.
प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलनादरम्यान विनोद पवार (वय 45, रा. गौलखेड) यांचा अपघाती मृत्यू झाला. पवार यांनी पूर्णा नदीत उडी घेतली, पण नदीचा वेगवान जलप्रवाहामुळे ते वाहून गेले.
एकीकडे अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत, तर पुण्यात त्यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला.
बुलढाणा जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 20 प्राथमिक शाळांमधील सुमारे 35 शिक्षकांना कमी पटसंख्येस जबाबदार धरून निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
बुलढाणा जिल्ह्यातील 3 मोठे, 7 मध्यम, 37 लघु प्रकल्प व 4 कोल्हापुरी बंधारे मिळून पाण्याची 15 जून 2025 रोजीची टक्केवारी 22.13 तर मागील वर्षीं याच तारखेपर्यंत 15.328 इतकी टक्केवारी होती, यंदाची टक्केवारी मात्र अधिक आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाचा अपघात झाला. रविवारी (दि. १८ मे) रात्री १२.३०-१ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला.
महायुतीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचे पुस्तक प्रकाशन, भाजप आणि अन्य विषयांवर भाष्य केले आहे.
यावर्षी पाऊस चांगला कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पहिल्या दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा 96 ते 100 टक्के पाऊस अपेक्षित आहे. नेमका हाच अंदाज कावळ्यांच्या घरटे बांधण्याच्या सवयींवरूनही लावला जात आहे.