Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्री मासे बुलढाणेकरांच्या गळाला ! दारोदारीच्या जिवंत मत्स्य विक्रीतून रोजगाराची वाट, प्रयोगशील व्यक्तीचा यशस्वी प्रयोग

एकदा सातारा येथे जिवंत मासे विक्री करतांना पाहिले असता, त्यांनी हा प्रयोग  बुलढाणा  येथे करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही वाट बिकट होती. यासाठी त्यांनी सलग ३ वर्षे मस्य तलावाचा अभ्यास केला. निलेश गवळी यांना जिल्ह्यातील मस्य व्यवसायाचाही अभ्यास होताच.

  • By Anjali Awari
Updated On: Mar 07, 2022 | 01:54 PM
Sea fish to Buldhanekar's throat! Waiting for a job by selling live fish at the doorstep, a successful experiment by an experimenter

Sea fish to Buldhanekar's throat! Waiting for a job by selling live fish at the doorstep, a successful experiment by an experimenter

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा : ‘एव्हरी डे इज नॉट ए संडे फॉर फिश ओनली’ अशा अर्थाची एक मासे खाणाऱ्यांसाठीची म्हण आहे. प्रत्येक रविवारी ज्याला आवडेल तो मासा मिळेलच असे नाही. मात्र, मासा खाताना जबड्याला, जिभेला तो टोचला, अडकला नाही पाहिजे, ही काळजी घेतली जाते. यासाठी काटा नसलेले समुद्री मासेच विकत घेण्याचा कल ओळखून निलेश गवळी पाटील यांनी येथील धाड नाक्यावर थेट मुंबईतील समुद्री मासे उपलब्ध करून दिले आहे. शिवाय जिवंत माशांची वाहनाद्वारे दारोदारी विक्री सुरू केल्याने रोजगारालाही वाट मिळाली आहे.

[read_also content=”ट्रक चालकानेच केली २६ लाखाच्या विदेशी दारूची अफरातफर, अपघाताचे नाटक करत ट्रक घुसवला चक्क नाल्यात https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/truck-driver-embezzles-rs-26-lakh-worth-of-foreign-liquor-pretends-to-be-an-accident-nraa-250512.html”]

निलेश गवळी यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पण नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून त्यांनी सावरायचा प्रयत्न मात्र सुरू ठेवला. एकदा सातारा येथे जिवंत मासे विक्री करतांना पाहिले असता, त्यांनी हा प्रयोग  बुलढाणा  येथे करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही वाट बिकट होती. यासाठी त्यांनी सलग ३ वर्षे मस्य तलावाचा अभ्यास केला. निलेश गवळी यांना जिल्ह्यातील मस्य व्यवसायाचाही अभ्यास होताच. धरणाच्या, नदीच्या माशांमध्ये काटे अधिक असणाऱ्या खूप प्रजाती आहेत. महाग असले तरी माशांना मागणी आहे. समुद्री माशांना तर अधिकच मागणी असते, हे गवळी यांनी हेरले. कटला, रोहू, वायर, मरळ, पंकज असे माशांचे ठराविक प्रकार बुलढाण्यात  पाहायला मिळतात. काटा अलगत बाजूला काढून खाण्यात कोकणी लोक तरबेज आहेत.

[read_also content=”जागतिक महिला दिनाच्या पूर्वीच महिलेवर गॅंग रेप ! विवाहितेसोबत होता तिचा पती, महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.. https://www.navarashtra.com/buldhana/vidarbha/buldhana/gang-rape-on-woman-just-before-international-womens-day-the-victim-was-with-the-married-woman-and-her-husband-nraa-250529.html”]

जिल्ह्यात मात्र अनेक मासे खवय्या काट्यांच्या नादाला लागण्यापेक्षा काटे नसलेल्या माशांना पसंती देतात. नेमकी हीच मेख निलेश गवळी पाटील यांनी ओळखली. येथील धाड नाक्यावर रामराम मच्छी शॉप उघडून मुंबईतील प्रसिद्ध असलेले समुद्री मासे उपलब्ध केले आहे. सुरमई, बांगडा, राणीमाशी, पांढरा व पिवळा बाम, छोटे प्रॉन्स, टायगर प्रॉन्स, गोडंबी,पांढरा पापलेट, मांदेली, बोंबील, रावस, मरळ असे विविध समुद्री मासे आता नागरिकांना सहज खरेदी करता येत आहे. शिवाय फिरत्या वाहनाद्वारे दारोदारी मत्स्य विक्री होत असल्याने खवय्यांना घरपोच सेवा उपलब्ध होत आहे.

[read_also content=”लतादीदींच्या १०० बहारदार गाण्यांचे तब्बल १२ तास गायन करून केली श्रद्धांजली अर्पण https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/tribute-was-paid-by-singing-100-songs-of-latadidi-for-12-hours-nraa-250566.html”]

विदर्भातील पहिलाच प्रयोग
सर्वच ठिकाणी मासे विक्री केली जाते. परंतु, मासे ताजे मिळत नाहीत. दारोदारी जाऊन वाहनात ठेवलेल्या पाण्याच्या टाकीमधील जिवंत माशा विक्रीचा केलेला हा प्रयोग विदर्भातून पहिला असल्याचे निलेश गवळी सांगतात. शहरातील विविध भागात वाहनाद्वारे जिवंत मासे विक्री होत असल्याने खवय्यांना घरपोच सेवा उपलब्ध होत आहे.

रोजगाराचे जाळे
निलेश गवळी यांनी एका मत्स्य तलावाची निर्मिती केली. या माध्यमातून तब्बल ६० जणांना तर, रामराम मच्छी शॉपच्या माध्यमातून १२ तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. लवकरच शॉपच्या ५ शाखा कार्यान्वित होणार, बेरोजगारांना संधी देण्यावर भर आहे. आजच्या तरुणांनी बेरोजगारीचे रडगाणे बाजूला सारून जिद्द व चिकाटीने सोय रोजगारातून विकास साधावा.

Reported by – प्रशांत खंडारे

Web Title: Sea fish to buldhanekars throat waiting for a job by selling live fish at the doorstep a successful experiment by an experimenter nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2022 | 01:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.