Mahila Bachat Gat financial crisis
कारण, सर्वत्र दुष्काळ पसरला असून, शेतकरी शेतमजूर सर्व आतचणीत आहेत काम नसल्यामुळे त्यांना उपासमारीची वेळ आली. असे असताना मायक्रो फायन्स कंपनी, महिला बचत गटातील कर्ज तसेच ग्रामसंघातून घेतलेले कर्ज भरणे शक्य नाही. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव उस्मान भाई गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित महिलांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महिलांना धीर देत त्यांना सरकारकडून न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दुष्काळी परिस्थितीचा विचार करून महिलांना कर्जहप्त्यांबाबत दिलासा द्यावा. तसेच कर्जवसुलीच्या नावाखाली होणारा कथित दबाव व त्रास थांबवावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ग्राम मुरंबी येथील महिला बचत गटाच्या महिलासह उस्मान गारवे, सुजित भगत, शेषराव मेश्राम, देवराव कटके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवाय महिला या ग्रामीण भागातील असल्याने त्या अशा बँकच्या कर्मचाऱ्यांना भिऊन आपल्याकडील वस्तू विकण्यापर्यंत बँकेचे पैसे देत आहेत. परंतु, त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण बिघडले. त्याच्यावर प्रचंड आर्थिक ताण आल्यामुळे सक्तीची कर्जवसुली थांबविणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ग्राम मुरंबी येथील महिलांबचत गटाच्या सर्व महिलांनी एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन देऊन कर्जमाफीची मागणी केली.
संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर अवैध साठवणूक, वाहतूक व हस्तांतरण रोखण्यासाठी कारंजा तालुका भरारी पथकाने धडक कारवाई केली. कारंजा शहरातील अलीनगर व एकतानगर परिसरातून २६० टन सोयाबीन कुटार जप्त करण्यात आले. तसेच तालुक्यातील १० गट्ट कारखान्यांची तपासणी करून उत्पादन बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.






