औरंगाबाद : शहरातील पुंडलिक नगर परिसरातील कारगिल मैदानाजवळील कचऱ्यामध्ये गुरुवारी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळ्याने खळबळ माजली आहे. अशपाक उर्फ मुक्या शेख अब्दुल असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिसांनी तपास सुरु केला होता. शेख मुबारक उर्फ बाबा हैदर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
[read_also content=”महाराष्ट्राच महाबजेट! २४ हजार कोटींचा तुटीता अर्थसंकल्प सादर; CNG होणार स्वस्त, सोने चांदी आणि जलवाहतुकीलाही दिलासा मिळणार https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/maharashtra-is-the-biggest-budget-24000-crore-deficit-budget-presented-cng-will-be-cheaper-gold-silver-and-shipping-will-also-be-relieved-nrvk-253355.html”]
पुंडलिक नगर परिसरात खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशपाक उर्फ मुक्या शेख अब्दुल असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत अश्फाक हा मुबारकच्या दारूच्या दुकानावर काम करत होता. अश्फाकने २७ हजार रुपये मुबारक कडून घेतले होते. त्या पैशावरून मुबारकने अश्फाकला बेदम मारहाण केली त्यातून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासाअंती अश्फाक आणि मुबारकमध्ये झालेल्या वादाविषयी पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता आरोपी मुबारकवर अवैद्य दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.
[read_also content=”मलिंगाची राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती; वॉर्नर या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये नाही खेळणार https://www.navarashtra.com/latest-news/rajasthan-royals-have-appointed-former-sri-lankan-veteran-lasith-malinga-as-their-fast-bowling-coach-253243.html”]