Sambhajinagar Sanskrit Camp : संस्कृत भाषेतून करिअरच्या संधी; संभाजीनगरमध्ये ८० विद्यार्थ्यांनी घेतले संस्कृतचे धडे

छत्रपती संभाजीनगर येथील एन-४ मधील महर्षि विद्यालयात संस्कृतभारती देवगिरी प्रांतातर्फे आठ दिवसीय निवासी संस्कृत प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १५ ते २२ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या शिबिरात ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
_Sambhajinagar Sanskrit Camp फोटो सौजन्य सोशल मिडिया
_Sambhajinagar Sanskrit Camp फोटो सौजन्य सोशल मिडिया _Sambhajinagar Sanskrit Camp फोटो सौजन्य सोशल मिडिया
Published on: 
Updated on: 
  • दहा दिवस आई-वडिल, मोबाईलपासून दूर

  • विवेकानंद विचार मंचतर्फे रविवारी संगीत संध्या

  • विद्यापीठात आज एकदिवशी राष्ट्रीय परिषद

Sambhajinagar Sanskrit Camp : छत्रपती संभाजीनगर येथे महर्षि विद्यालयात आयोजित कार्यक्रमात संस्कृत ही केवळ भाषा नव्हे तर, भारतीय ज्ञानपरंपरेचे प्रवेशद्वार असल्याचे प्रतिपादन लक्ष्मीकांत धोंड यांनी केले. संस्कृतभारती देवगिरी प्रांततर्फे छत्रपती संभाजीनगर येथे १५ ते २२ नोव्हेंबर असे आठ दिवसीय निवासी संस्कृत प्रबोधन शिबिर एन ४ मधील महर्षि विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. शिबिरात ८० प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना तज्ज्ञ शिक्षकांकडून संस्कृत शिकण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवशी सर्वांचे गंधाक्षदा, आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. इयत्ता ८वीच्या पुढचे विद्यार्थी आणि प्रौढ संस्कृतप्रेमी यांच्यासाठी संस्कृत संभाषण कौशल्य आणि संस्कृत व्याकरण शिकण्याची योग्य संधी, योग, प्राणायाम, ध्यान, वैयक्तिक विविध कला गुण सादर करण्याची संधी, नियुद्ध (कराटे), भाषाक्रीडा, क्रीडांगण, विविध प्रकारच्या ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान विषयी व आरोग्य, दिनचर्येबाबत मार्गदर्शन मिळत आहे.

संस्कृत भाषेच्या माध्यमातून भविष्यात करिअरच्या संधी आदींविषयी जीवन शिक्षणाविषयी हसत खेळत उपक्रम संपन्न झाले. शिबिरासाठी महर्षी विद्यालयाने निवास व्यवस्था करण्यात आली होती. प्रशिक्षणार्थीना लक्ष्मीकांत धोंड, अविनाश गोहाड, डॉ. अजित चौधरी, एस. एम. कुलकर्णी, निवेदिता सराफ, डॉ. दिवाकर मांडाखळीकर यांनी मार्गदर्शन केले. दीपोत्सव आणि भारतमाता पूजनाने वर्गाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आचार्य अविनाश गोहाड, शुभदा धांडे, डॉ. अजित चौधरी, संतोष इसादकर, नलिनी लेकुरवाळे, आशा सुखदेवे, अशोक वाशिवले, मेधा पाठे, माताडे, डॉ. दिवाकर कुलकर्णी, मांडाखळीकर आदींनी परिश्रम घेतले.

दहा दिवस आई-वडिल, मोबाईलपासून दूर

आई वडिलांना सोडून ही मुले येथे स्वावलंबन शिकण्यासाठी उपस्थित होती. मुख्य महत्त्वाचे म्हणजे मोबाईलपासून दूर राहात हा वर्ग सर्वांनी पूर्ण केला. या सात दिवसात कितीतरी प्रकारचे संरकार, नियमितता, शारिरीक, बौद्धिक मेहनत, विचारांची देवाणघेवाण, एकमेकांशी वागायचे कसे, मदत करणे तसेच संस्कृत भाषेचा प्रभाव त्यांच्या मनावर कोरला गेला.

विवेकानंद विचार मंचतर्फे रविवारी संगीत संध्या

छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) सिडको, शालिवाहन संशोधन मंडळ व विवेकानंद विचार मंचच्या वर्धापन दिनानिमित रविवारी (दि. २९) दुपारी साडेचार वाजता 'संगीत संध्या' कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम एन-४ सिडको येथील विवेकानंद मैदानावर पार पडणार आहे. या संगीत संध्यामध्ये गायक प्रा. गजानन कैचे व गायिका युगंधरा केचे कला सादर करणार असून, कार्यक्रमाचे निवेदन प्रा. ज्ञानेश्वर कुळकर्णी करणार आहेत, रसिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विद्यापीठात आज एकदिवशी राष्ट्रीय परिषद

छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागातर्फे 'ड्रामा अॅण्ड म्युझिक हार्मनी' (नाट्य आणि संगीत यांचा समन्वय) या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे. ही परिषद बुधवारी (दि.२५) सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रादेशिक कला विभागात, पार पडणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा. वैशाली खापर्डे भूषवणार आहेत, या कार्यक्रमास डॉ. प्रशांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या राष्ट्रीय परिषदेत डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संजय मोहोड, डॉ. पुलनजीब खान, डॉ. प्रवीण भोळे, डॉ. संजय देशपांडेकर, डॉ. किशोर शिरसाठ, डॉ. गणेश चंदनशिवे हे विचार मांडणार आहेत.