Municipal Corporation Recruitment Exam Scam: 50 Candidates Disqualified After CCTV Investigation ( महानगरपालिका भरती परीक्षा घोटाळा: सीसीटीव्ही तपासणीनंतर ५० उमेदवार अपात्र )
महापालिकेच्या गट-क संवर्गातील २२२ पदांसाठी राज्यातील १८ शहरांतील ३१ परीक्षा केंद्रावर ८ आणि ९ जुलै २०२६ रोजी आयबीपीएस संस्थेमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या भरतीत एकूण १० संवर्गातील पदासाठी परीक्षा झाल्या. त्यापैकी आठ पदांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये अनुलेखन, उद्यान सहायक, पशुधन पर्यवेक्षक, सहायक सुरक्षा अधिकारी, उपअग्निशमन अधिकारी, रोपपाल, अग्निशमन आणि निचालक या पदांचा समावेश आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या दोन पदांचे निकाल पुढील आठ ते दहा दिवसांत की जाहीर होणार आहेत.
भरती प्रक्रिया पारदर्शक
निवड झालेल्या अन्य उमेदवारांच्या कागदपत्रांची निवड समितीकडून पडताळणी केली भाणार आहे. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्याचे नियोजन आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सखोल तपासणी करण्यात आल्याने निकाल जाहीर होण्यास काहीसा विलंब झाल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले,
परीक्षेतील सीसीटीव्ही विश्ण, रफ शीट आणि प्राप्न सोडविण्याच्या पद्धतीची तपासणी करण्यात आली. काही उमेदवारांनी शेवटच्या दहा मिनिटांत सर्व धानांची उत्तरे खुणावल्याचे आढळले. त्यामुळे ४० ते ५० उमेदवारांच्या कामगिरीबाबत संशय निर्माण झाला, त्यांची प्रत्यक्ष चाचणी घेऊन पडताळणी करण्यात आली. गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दोन उमेदवाराच्या हालचालीही सीसीटीव्हीमाये संशयास्पद आढळल्या. त्यांना महापालिकेत बोलावून दहावी-बारावीच्या गुणांची तपासणी करण्यात आली. तसेच साधी प्रश्नपत्रिका देऊन चाचणी घेण्यात आली. मात्र, त्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे आयुक्त वेडगे यानी सांगितले.






