छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडे तसेच कवट्यांची माळ मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बीडीडीएस पथकांनी डॉग स्कॉडद्धारे व इतर बॉम्ब शोधक नाशक यंत्राद्वारे पाहणी केली. तपासणी दरम्यान स्फोटकाचे एक बॉक्स आढळून आल्याने व त्यामध्ये काही बॉम्बसदृष्य वस्तू दिसल्या.
शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी व गणेश मंडळांच्या सर्वानुमते या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
Sambhajinagar Crime : एका भोंदू बाबावर लोकांकडून भूत उतरवण्याच्या नावाखाली अमानुष कृत्य केल्याचा आरोप आहे. या बाबाने लोकांना चक्क बुटाने मारहाण केली आणि स्वतःची मूत्रही प्यायला लावले, असा आरोप आहे.
मारहाणीनंतर गंभीर जखमी सुनील काहीही न खाता-पिता झोपेतच पडून राहिला. तब्येत अधिक खालावल्याने २८ मे रोजी त्याला सहारा हॉस्पिटल व नंतर घाटीत नेण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
शिवराज्याभिषेक सोहळ्यावरुन संभाजी भिडे गुरुजींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
२०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही केवळ ११ हजार ३४१ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. परिणामी ६ हजार २११ जागा अजूनही भरायच्या बाकी आहेत.
नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजी (NSBT) या महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी नुकतीच जपानमधील फुकुशिमा शहरात तीन आठवड्यांसाठी शैक्षणिक सफर केली आहे.