महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्यात अजूनही विलंब होत आहे. युतीतील भाजप-शिंदे गटाचा जागावाटप तिढा सुटलेला नाही तर काही प्रभागांत प्रभावी उमेदवार मिळत नसल्यानेही अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत.
टीओडी मीटर बसवलेल्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १ लाख ८७ हजार घरगुती ग्राहकांना गेल्या चार महिन्यांत ७५ लाख रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे.
अनिल तातेराव डुगले (वय ३०, रा. मयुर पार्क) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आणि त्यांचा मित्र मयुर प्रकाश जैस्वाल (रा. घृष्णेश्वर कॉलनी) हे २० ऑक्टोबर रोजी रात्री कपडे घेण्यासाठी जय भवानीनगर…
सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य सरकारला निवेदन सादर करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये २३ नोव्हेंबरला होणाऱ्या TET परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. २४,३८५ परीक्षार्थींसाठी ३७ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षा व सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबाने तरुण अक्षय शिरसाटवर चाकू व रॉडने जीवघेणा हल्ला केला. तो गंभीर जखमी असून, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. परिसरात तणावाचे वातावरण आहे.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसून लॅब जळाल्याने कंपनीचे एक कोटीचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बॅरिस्टर काही वर्षे आकार टुल्स लि. मध्ये कायमस्वरूपी कामगार म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन अलीकडेच ठेकेदारामार्फत तात्पुरत्या स्वरूपात काम सुरू केले होते.
अनेक तासानंतर अजय बोरकर याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह कायदेशीर प्रक्रियेसाठी शिऊर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिला. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.
मुंबई मार्गाच्या धतींवर समृद्धी महामार्गावरही फुड मॉल उभारण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. 16 पेट्रोलपंपाशेजारीच हे फुडमॉल उभारण्यासाठी प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.
चिकलठाणा परिसरातील प्राईड फिनिक्स सोसायटी येथे राहणाऱ्या आकाश राजेंद्र देवूळगावकर यांच्या घरी 20 जून रोजी चोरट्यांनी चोरी करुन 5 लाख 43 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.