Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठीत संवाद साधत ममता बँनर्जीनी जिंकली उपस्थितांची मने!

शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 01, 2021 | 03:52 PM
मराठीत संवाद साधत ममता बँनर्जीनी जिंकली उपस्थितांची मने!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी दोन दिवसांच्या मुंबईभेटीच्या (Mumbai Visit) दुस-या दिवसाच्या सुरूवातीलाच महाराष्ट्र मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात “महाराष्ट्राच्या सर्व जनतेला माझे अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा!”

असा चक्क मराठीत संवाद सुरू केला. त्यावेळी सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पत्रकारांशी आणि उपस्थितांशी मराठीतून संवादांची सुरूवात करत दिदीनी त्यांची मने जिंकली. यावेळी सभागृहात जावेद अख्तर आणि स्वरा भास्कर उपस्थित होते. यावेळी ममता बॅनर्जी यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली.

तृणमुल कॉंग्रेसचा राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर ममता बनर्जी यानी तृणमुल कॉंग्रेसचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा कार्यक्रम आखला आहे, त्याची सुरूवात करत त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. मुंबईत त्यांच्या दोन दिवसांच्या भेटी दरम्यान सांस्कृतिक, राजकीय तसेच उद्योग आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम होता. मुंबई दौऱ्यावर पोहोचताच काल ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यानी शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची एकजूट अशक्य
दरम्यान, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तृणमूल केवळ पश्चिम बंगालपुरते मर्यादित राहणार नाही, असा स्पष्ट संदेश ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही महिन्यांत दिला आहे.

महाराष्ट्रही सरकारी दहशतवाद्यांशी सामना करेल
दरम्यान ममतांसोबत नेमकी काय चर्चा करण्यात आली? याची माहिती खा राऊतांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले की यावेळी राजकीय चर्चा सोबतच भाजपकडून तपास यंत्रणांचा होणारा गैरवापर या विषयावर अधिक चर्चा झाली. शासकीय दौऱ्यावर असल्या तरी मुंबईत आल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतात. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा होती. मात्र, आजारपणामुळे त्यांना कोणीही भेटू शकत नाही. त्यामुळे ममता दीदींनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते तपास यंत्रणांचा दबाव टाकून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचे महान कार्य पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत, असे ममता दीदींनी सांगितले. तसेच महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या सरकारी दहशतवाद्यांशी सामना करेल याची खात्री आहे, असेही बॅनर्जी म्हणाल्याचे संजय राऊतांनी सांगितले.

Web Title: Conversing in marathi mamata banerjee won the hearts of the audience in mumbai visit nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2021 | 03:52 PM

Topics:  

  • mamta banerjee

संबंधित बातम्या

West Bengal Violence: वक्फ कायद्यावरून बंगाल पेटलं; हिंदू कुटुंबे…; हिंसाचार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
1

West Bengal Violence: वक्फ कायद्यावरून बंगाल पेटलं; हिंदू कुटुंबे…; हिंसाचार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

भारताला धर्मशाळा बनू देणार नाही..; वाढत्या घुसखोरीवर मोदी सरकार बसवणार वचक
2

भारताला धर्मशाळा बनू देणार नाही..; वाढत्या घुसखोरीवर मोदी सरकार बसवणार वचक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.