मुंबई : देशातील एव्हिएशन उद्योगाला (Aviation Industry) पाठिंबा व चालना देण्याच्या प्रयत्नांशी सातत्याने बांधील राहत १ नोव्हेंबर २०२२ पासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai International Airport) विशेषत: खाजगी जेट विमानांसाठी (For Private Jets) नवीन, नूतनीकरण केलेली जनरल एव्हिएशन टर्मिनल सुविधा सुरू करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA)ने त्यांचे नवीन, नूतनीकरण केलेले जनरल एव्हिएशन (GS) टर्मिनल सादर केले आहे, जे प्रवाशांना आलिशान प्रवास अनुभव व सोयीसुविधा देते.
जीए टर्मिनल उंची, दैदिप्यमान प्रकाशव्यवस्था व एैसपैस जागेने युक्त आलिशान इंटीरिअर्ससह प्रवाशांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. २४X७ तास कार्यरत असलेले चौकस व मैत्रीपूर्ण कर्मचारी आलिशान स्वागत कक्षामध्ये अतिथींचे स्वागत करतील.
टर्मिनल सुपर-फूड लाइट बाइट्सच्या क्यूरेटेड मेनूशी पूरक बटलर सेवेसह विस्तृत लाऊंजेस्, स्टायलिश बार ते बुफे व ॲज पर ॲन ए ला कार्ट मेनूच्या माध्यमातून सर्व्ह करण्यात येणार्या जागतिक पाककलांचा आस्वाद देणार्या सुविधा देते.
अतिथी अत्याधुनिक ऑडिओ व व्हिडिओ उपकरणांनी युक्त मीटिंग व कॉन्फरन्स रूम सुविधा आगाऊ आरक्षित करू शकतात. आवश्यक व्यवसाय विनंत्यांपासून आरामदायी प्रवासापर्यंत सीएसएमआयएचे ७५३.२६ चौरस मीटरवर पसरलेले जीए टर्मिनल लक्झरीला पुनर्परिभाषित करते.
विमानतळावरून चार्टर्ड फ्लाइट्सद्वारे उड्डाण करणार्या प्रवाशांच्या हालचाली आणि प्रक्रियेस समर्थन देण्याच्या उद्देशाने टर्मिनल बांधले गेले आहे. मुंबई विमानतळावरील नवीन जीए टर्मिनल हे एक आधुनिक व आकर्षक क्षेत्र आहे, जे प्रवाशांची सुरक्षा, सुरक्षितता आणि स्वास्थ्याला नेहमीच प्राधान्य देते.
टर्मिनल सीमाशुल्क व इमिग्रेशनसह कार्यक्षम प्रक्रिया क्षेत्र प्रदान करते आणि टर्मिनलमधून खाजगी जेट विमानांच्या स्टॅण्ड्सवर त्वरित प्रवेश देते. तसेच प्रवेश नियंत्रण प्रणाली, वाय-फाय सक्षम सेवा, आयटी सिस्टिम इंटीग्रेटेड सिस्टिम्स, प्रवाशांना किमान प्रतीक्षा कालावधीसह बोर्डिंग पास सक्षम करणे, समर्पित पोर्टर सेवा, चेक इन आणि हॅन्ड बॅगेज प्रक्रिया यांसारख्या परस्परसंवादी सुविधांच्या माध्यमातून कार्यक्षमपणे प्रक्रिया केली जाते. याव्यतिरिक्त टर्मिनल विशेष गरजा असलेल्या प्रवाशांसाठी आणि कमी प्रवास करणार्या प्रवाशांसाठी पूर्णपणे उपलब्ध आहे.
टर्मिनल दर तासाला ५० हून अधिक प्रवाशांना हाताळू शकते, ज्यामधून प्रवासी प्रत्येकवेळी वेळेवर त्यांच्या फ्लाइट्समध्ये बोर्डिंग करण्याची खात्री मिळते. जीए टर्मिनल आणि सह-स्थित नवीनच विकसित केलेले जनरल एव्हिएशन एअरक्राफ्ट पार्किंग स्टॅण्ड्ससह प्रवाशांना क्षणात बोर्डिंग किंवा डि-बोर्डिंगसाठी विमानामध्ये जाण्याची व परतण्याची सोईस्कर सुविधा मिळेल.