Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थेट अमित शहांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन; कालच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या गोटात पडद्याआड मोठ्या हालचाली

  • By युवराज भगत
Updated On: Jun 06, 2024 | 04:26 PM
थेट अमित शहांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन; कालच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या गोटात पडद्याआड मोठ्या हालचाली
Follow Us
Close
Follow Us:

After Lok Sabha 2024 Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. राज्यात भाजपचे केवळ 9 उमेदवार जिंकून आले. मागील १० वर्षांमधील ही सर्वात खराब कामगिरी असून भाजपच्या या पराभवाची जबाबादारी घेत काल देवेंद्र फडणवीस यांनी थेट वरिष्ठ नेतृत्वाला मला सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केली. त्यानंतर आज अमित शहांनी फडणवीस यांना फोन केल्याची चर्चा आहे.

उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका
लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर देशात एनडीएचे सरकार स्थापन होत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसले तरी भाजपाप्रणित एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला असून, महाराष्ट्रामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. राज्यात भाजपला फक्त 9 तर महायुतीला एकूण 17 जागा मिळाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत.

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप वर्तुळात खळबळ
महाराष्ट्रातील भाजपच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत कालच्या पत्रकार परिषदेत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद सोडण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मला संघटनेसाठी सरकारमधून मुक्त करा, अशी विनंती फडणवीस यांनी केली होती. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत होत्या परंतु त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील नेत्यांनीसुद्धा त्यांनी पक्षातच काम करावे, असे सांगितले होते. त्यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीने त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता.

नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांची भेट घेणार

आज ते दिल्लीत जाणार असून नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच आज सकाळी अमित शाह यांनी स्वत: फडणवीस यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांच्या मनात नेमकं काय चालंलय ते ऐकून, त्यांच्या भावना शाह यांनी जाणून घेतल्या. सविस्तर माहिती घेतली आणि या मुद्यावर दिल्लीत आल्यावर, प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू, असेही शाह यांनी फडणवीस यांना सांगितले.

नेत्यांना फडणवीस यांचे नेतृत्व हवंय
उद्या भाजपची संसदीय पक्षाची बैठक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याने त्यावेळी शाह यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अमित शाह या हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील, त्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्यामागची कारणं जाणून घेतील, असे समजते. कारण राज्यातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला, नेत्यांना फडणवीस यांचे नेतृत्व हवं आहे. या बैठकीत काय होतं, पदावरून मुक्त करण्याची फडणवीसांची मागणी मान्य होते का, नेते त्यांना काय मार्गदर्श करतात, पुढे काय घडतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत भाजपला मोठा फटका
लोकसभा निवणुकीत भाजपला उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून आले होते. मात्र या निवडणुकीत हा आकडा फक्त 17 आहे. 2019 साली भाजपाचे 23 खासदार होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रा भाजपचे केवळ 9 खासदार निवडून आले. पक्षासाठी ही अतिशय धक्कादायक बाबा असून राज्याातील या खराब कामगिरीची जबाबादारी स्वीकारून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली होती.

“ पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी स्वीकारतो. मी मान्य करतो, मी स्वत: कमी पडलो. भाजपाला झटका बसला. महाराष्ट्रात जो पराभव झाला, त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो. मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायच आहे. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करणार आहे की, मला सरकारमधून मोकळ करावं. जेणेकरुन, मला पूर्णवेळ पक्षासाठी काम करण्याची संधी मिळेल. ” असं काल देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता पुढे काय घडतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Web Title: Direct call from amit shah to devendra fadnavis big moves behind screen in bjp after yesterdays bjp press conference nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2024 | 04:26 PM

Topics:  

  • Lok Sabha Election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.