Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन झाल्यास वाढणार मानसिक ताण आणि कौटुंबिक हिंसाचार, तज्ञांनी केले स्पष्ट

गेल्या वर्षी केंद्र सरकारने(central government) लागू केलेल्या लॉकडाउनमुळे(lockdown) संपूर्ण भारताची आर्थिक स्थिती बिघडलेली असून जर खरोखरच लॉकडाऊन झाले तर नागरिकांच्या मानसिक ताणतणावात(stress) वाढ होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.तसेच कौटुंबिक हिंसाचारही वाढू शकतो.

  • By साधना
Updated On: Feb 22, 2021 | 07:08 PM
lockdown

lockdown

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: कोरोनाचा संसर्ग मुंबईसकट(mumbai) महाराष्ट्रामध्ये(maharashtra) वाढत असून मुख्य शहरांमध्ये नाईट कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी आठ दिवसांचा अल्टिमेटम नागरिकांना दिला आहे. नागरिकांनी शासनाचे नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन(lockdown in maharashtra) केले जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  गेल्या वर्षी केंद्र सरकारने(central government) लागू केलेल्या लॉकडाउनमुळे(lockdown) संपूर्ण भारताची आर्थिक स्थिती बिघडलेली असून जर खरोखरच लॉकडाऊन झाले तर नागरिकांच्या मानसिक ताणतणावात(stress) वाढ होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.तसेच कौटुंबिक हिंसाचारही वाढू शकतो.

[read_also content=”सावधान ! कोरोनामुळे होऊ शकतो थायरॉइडवर गंभीर परिणाम, कसे ते जाणून घ्या https://www.navarashtra.com/latest-news/know-how-the-corona-virus-affects-the-thyroid-glands-nrsr-93193.html”]

याविषयी मानसोपचार सल्लागार डॉ. प्रतीक सुरंदशे सांगतात,“ कुठल्याही संसर्गजन्य आजारात तो पसरू नये यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचं असते . मात्र, या लॉकडाऊनमध्ये मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण भारतातील ८० टक्क्यांहून जास्त नागरिक हे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या व उद्योगधंद्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक उद्योगधंदे बंद झाले. त्यामुळे अनेक नागरिक हे मानसिक ताणतणावात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून अर्थव्यवस्था रुळावर येत होती. मात्र गेल्या आठ दिवसांमध्ये नागरिकांच्या चुकीमुळेच कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे.

डॉक्टरांनी पुढे सांगितले की, आपल्याला लॉकडाऊन थांबवायचे असेल तर शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. आजही कोरोनाविषयी एकीकडे टोकाची बेफिकिरी आणि दुसरीकडे टोकाचा मानसिक ताणतणाव अशा विचित्र स्थिती समाजात दिसून येत आहे, त्यामुळे नियमित मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व वारंवार हात पाय धुणे ही त्रिसूत्री प्रत्येक नागरिकाने अवलंबली पाहिजे, यासोबतच सोशल मीडियावरील चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवायला नको.

कौटूंबिक हिंसाचार व लॉकडाउन याविषयी मनोविकारतज्ञ डॉ ओंकार माटे सांगतात, “समाजातील सर्वांत असुरक्षित मानले जाणारे घटक- स्त्रिया व मुले यांना कायमच अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे, नुकत्याच एका सर्वेक्षणानुसार असे समोर आले की आणीबाणी, आर्थिक संकट, साथीचे रोग यांनी वेढलेल्या या टाळेबंदीच्या काळात स्त्रिया व लहान मुले यांच्यावरील हिंसाचाराचे प्रमाण दुपटी-तिपटीने वाढले आहे.

भारतात, कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी या राष्ट्रीय महिला आयोगाकडे केल्या जातात. राष्ट्रीय महिला आयोगाच्या ताज्या आकड्यांनुसार या लॉकडाऊनच्या काळात आलेल्या तक्रारी सामान्य काळाच्या तुलनेत दुपटीने वाढल्या आहेत. कोरोनामुळे आलेली जागतिक मंदी, बंद पडलेले उद्योगधंदे, बेरोजगारी, पगारातील कपात, आर्थिक अडचणी, गरीबी, या सर्व संकटातून आपण सावरू की नाही याची भिती, दडपण, राग अशी अनेक कारणे कौटुंबिक हिंसाचार निर्माण करतात.

Web Title: Doctor says if lockdown is declared again it will increase the mental stress and domestic violence nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2021 | 07:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.