Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांना कमजोर करण्यासाठी सात निकटवर्तीयांवर ईडीची धाड, अविनाश भोसलेंपासून अनिरुद्ध देशपांडेपर्यंत ED ची कारवाई, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं यासाठी अजित पवार वारंवार गुप्तभेट घेत असल्याचे पाहायला मिळाले. तरीही शरद पवार ऐकत नसल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांवर आता ईडीच्या धाडी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 19, 2023 | 06:43 PM
शरद पवारांना कमजोर करण्यासाठी सात निकटवर्तीयांवर ईडीची धाड, अविनाश भोसलेंपासून अनिरुद्ध देशपांडेपर्यंत ED ची कारवाई, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत यावे यासाठी अजित पवार वारंवार भेटीगाठी घेऊन सोबत येण्याबाबत विनंती करीत असतानाच दुसरीकडे शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केंद्रीय यंत्रणांच्या धाडी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच जळगावच्या ईश्वर लाल जैन यांच्या कंपन्यांवर ईडीच्या धाडी पडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांचे निकटवर्तीय ईडीच्या रडारवर आल्याचा पाहायला मिळत आहे.

लखीमचंद्र ज्वेलर्सची अधिकाऱ्यांची कसून चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन जुलैला फूट पडली आणि त्यानंतर पहिल्यांदाच ईडी कडून शरद पवारांना अप्रत्यक्षरीत्या टार्गेट करण्यात येत असल्याचं समोर आला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा वर्षे खजिनदार राहिलेल्या जळगावचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सचा मुंबई, नाशिकसह सहा कंपन्यांवर ईडी आणि आयकर विभागाने छापे मारले आहेत. यावेळी माजी आमदार मनीष जयंती यांचे देखील अधिकाऱ्यांना कसून चौकशी केली आहे.

ईडीचा ससेमिरा पुन्हा एकदा सुरू

दिवसेंदिवस शरद पवार यांचे विरोधकांकडून तयार करण्यात आलेल्या आघाडीत महत्त्व वाढताना पाहिला मिळत आहे. अशावेळी शरद पवार यांना एनडीए सोबत घेऊन विरोधकांची आघाडी खिळखिळी करण्याचा प्रयत्न केंद्रीय स्तरावर होत आहे. याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांना देखील सोबत घेण्यात आला आहे. मात्र तरी देखील शरद पवार सोबत येत नसल्यामुळे ईडीचा ससेमिरा पुन्हा एकदा सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे

आत्तापर्यंत धाडी पडलेले शरद पवारांचे निकटवर्तीय 

1) वाधवान बिल्डर (एचडीआयएल प्रकरण) मार्केटींग कंपनीची ८८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्या कार्यालयावर छापे आणि अटक.

2) दिवाण बिल्डर (डीएचएफएल प्रकरण) या प्रकरणात सतरा विविध बँकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप असून यामध्ये अविनाश भोसले आणि वादवान बंधू यांच्या कंपन्यांना पैसा दिल्याचा आरोप आहे. अविनाश भोसले आणि वादवान हे दोघेही शरद पवारांचे निकटवर्ती आहेत

3) अनिरुद्ध देशपांडे अॅमनोरा टाऊनशिप चे मालक आणि सिटी बँकेचे चेअरमन यांच्यावर ईडीची धाड. आर्थिक गैर व्यवहारातून या धाडी पडल्याची माहिती

4) अविनाश भोसले डीएचएफएल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयची कारवाई. भोसले यांचा एक हेलिकॉप्टर देखील ताब्यात

5) नरेश गोयल- जेट एअरवेज 538 कोटी रुपयांच्या गतीत बँक फसवणुकी प्रकरणी ईडीची कारवाई. नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी विरोधात मनी लॉन्ड्री

6) राणा कपूर येस बँकेचे अध्यक्ष असताना राणा कपूर यांनी डीएचएफएल, एचडीआयएल अबिल यासारख्या कंपन्यांना मोठ्या रकमेचे कर्ज दिले आणि त्या बदल्यात लाच घेतली. येस बँकेने तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि त्यापैकी वीस हजार कोटी रुपये बुडीत कर्जात बदलले. यासाठी देखील लाच घेतल्याचा आरोप आहे

7) ईश्वरलाल जैन- राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 वर्ष खजिनदार. प्रसिद्ध राजमल लकीचंद ज्वेलर्सचे मालक. माजी खासदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय

केंद्रीय यंत्रणांकडून शरद पवारांचे आर्थिक संबंध असलेल्या 6 उद्योजकांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. यावर सूचक भाष्य करताना रोहित पवार यांनी बीडच्या सभेत आपल्याला धनशक्तीविरोधात लढाई लढायची आहे. ही लढाई लढत असताना केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा मागे लागण्याची शक्यता देखील त्यांनी बोलून दाखवली होती  केंद्रीय यंत्रणांचा वाढता त्रास लक्षात घेऊन अजित पवार गटात जाणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी आहे. असं असताना देखील शरद पवारांनी मात्र नरमाईची भूमिका न घेता लढाई लढण्याचीच तयारी दर्शवल्याचं पाहिला मिळत आहे. यामुळे नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस येऊन देखील पाटील यांनी मैदानात उतरुन लढण्याची भाषा करायला सुरुवात केली आहे

एकंदरितच केंद्रीय यंत्रणांचा वाढता फास असला तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढण्याचीच तयारी दर्शवल्याचं चित्र आहे. अशावेळी आगामी निवडणूका लढण्यासाठी आर्थिक गणितं जुळवताना पवार गटाला अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार गट शरण येणार की लढाई लढणार हे पाहावं लागेल

 

Web Title: Ed raids seven close associates to weaken sharad pawar from avinash bhosle to anirudh deshpande nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2023 | 06:25 PM

Topics:  

  • NCP president Sharad Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar : जगात क्रांती होत आहे, पण…; शरद पवारांनी व्यक्त केली खंत
1

Sharad Pawar : जगात क्रांती होत आहे, पण…; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.