
Coastal road work is also underway in the Corona crisis; The project will be completed by 2023
मुंबई – भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळा’ ह्या टिबीएम संयंत्राच्या सहाय्याने आज पुर्ण झाले. या बोगदा खणन कामाचा ‘ब्रेक थ्रू’ आज गिरगाव चौपाटी येथे पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुंबई किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी या पहिल्या २.०७० कि.मी लांबीच्या पहिल्या बोगद्याचे काम मावळा या टीबीएमद्वारे संयंत्राच्या सहाय्याने आज पूर्णत्वाला गेले. या कार्यक्रमास मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह पालिकेचे नगरसेवक, पालिकेचे अधिकारी ही दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा हा प्रकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शाब्बास, उत्तम काम करत आहात.“मावळा” या शब्दाला साजेसे काम यंत्र आणि ते यंत्र हाताळणारे माझे सहकारी करत आहेत. स्वप्नं प्रत्यक्षात आणणं कठीण असतं पण मुंबईकरांचे हे स्वप्नं पुर्ण करण्याच्या ध्यासाने काम करणाऱ्या माझ्या टीमचा मला अभिमान आहे. या मावळ्याच्या कामाचा शुभारंभ केलेला दिवस आठवतो. तेंव्हा आपण कामाचा टप्पा कधी आणि कोणत्या काळात पूर्ण करू हे सांगितले होते.
कोरोना काळात, उन वारा पावसाच्या काळातही प्रकल्पाचे काम अडले नाही, ते तितक्याच वेगाने सुरु राहिले. दोन टोक विशेषत: समुद्राखालून जोडायचे हे काम आव्हानात्मक होते. हे काम आपण शक्य करून दाखवले त्याबद्दल तमाम मुंबईकरांच्या वतीने धन्यवाद.१९९५ साली मुंबईत युती शासनाने ५५ उड्डाणपूल बांधले. ते ही आता कमी पडू लागले आहेत. नंतर आपण कोस्टल रोडचे स्वप्न पाहिले. आपण केवळ रस्त्याचे काम करत नाही तर आसपासच्या भागाचे सुशोभिकरणही करत आहोत. ठरलेल्या तारखेला सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण होईल असा मी आश्वासन देतो. शासन आवश्यक असलेले सर्व सहकार्य करेल याचे वचन देतो. मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही अहोरात्र झटत आहात तुम्हाला मी शुभेच्छा देतो. कोस्टल रोड तुमच्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीतून निश्चित कालावधीच्या आधी पूर्ण होईल.
ऑन ग्राऊंड काम करणाऱ्या टीमलाही शुभेच्छा – मंत्री आदित्य ठाकरे
आज अतिशय आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे. कठीण काम मावळ्याने पार पाडले असून पहिले टनेल पूर्ण इज ऑफ लिवींगवर केंद्रीत करून केले आहे. मुंबई उपनगरात विविध कामे सुरू करण्याची असून यामुळे मुंबईच्या विकासात हातभार लागणार आहे. या कामासाठी बीएमसी टीमचे अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा. ऑन ग्राऊंड काम करणाऱ्या टीमलाही शुभेच्छा.
आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रतिक्रया –
‘सुखाचा प्रवास मोकळा श्वास’ हे या प्रकल्पाचे ब्रीदवाक्य आहे. एक वर्षात बोगदा पूर्ण होणार आहे. ११ जानेवारी २०२१ रोजी या कामास प्रारंभ
असून नियोजित तारखेपर्यंत हा बोगदा पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.