Murder in Baramati Dispute over chicken
मुंबई : आज गटारी (Gatari) अमावस्या आहेत, उद्यापासून श्रावण (Shravan) महिना सुरु होणार आहे, त्यामुळं श्रावण एक महिन्यात अनेकजण मांसाहार (Non veg) तसेच मद्यपान (Wine) करत नाहीत. त्यामुळ आजची गटारी अमावस्याच्या दिवशी खवय्ये व तळीराम पहाटेपर्यंत खाण्यावर ताव मारतात. तर तळीराम मद्यप्राशन करतात. दरम्यान, आज गटारी अमावस्या असल्यामुळं खाद्याप्रेमीनी अनेक बेत आखले आहेत. त्यातच बॉयलर कोंबडीपेक्षा गावरान कोंबडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, परिणामी गावरान कोंबड्यांचे भाव सुद्धा वाढले आहेत. (Gatari Chicken Price Hike)
खवय्यांचा मांसाहारवर ताव
तर खवय्यांनी मासे, चिकन व मटन (Chicken, matan and fish) खरेदी करत गटारी साजरे करण्याचा त्यांचा बेत आहे. त्यामुळं चिकन, मटन सेंटरबाहेर मोठ्या प्रमाणात खवय्यांची गर्दी दिसत आहे. तसेच मासे मार्केटमध्ये सुद्धा गर्दी पाहयला मिळत आहे. गावरान कोंबडीचे दर वाढले असतानाही त्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बॉयलर तसेच गावठी कोंबड्या उत्पादकांच्या कुक्कुटपालनासह चिकन सेंटरवर गर्दी केली आहे. ग्राहकांची प्रचंड मागणी आणि वाढलेल्या दरामुळे गावरान कुक्कुटपालन व्यवसायिकांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तसेच अंड्यांची सुद्धा मागणी वाढली आहे.
तळीराम गटारीत लोळणार?
उद्यापासून श्रावण महिना सुरु होणार आहे, त्यामुळं श्रावण एक महिन्यात अनेकजण मांसाहार तसेच मद्यपान करत नाहीत. त्यामुळ आजची गटारी अमावस्याच्या दिवशी खवय्ये व तळीराम पहाटेपर्यंत मजा करत असतात. पुढील एक महिना मद्य पिण्यास मिळणार नाही, त्यामुळं आज पहाटेपर्यंत तळीराम मद्य प्राशन करणार आहेत. तसेच मुंबईत किती दारु तळीरामांनी रिचवली यांची आकडेवारी सुद्धा समोर येते. पण गटरी अमावस्यानिमित्त तळीराम दारुचा आस्वाद घेत, एकदम तर्रर्र होऊन गटारात लोळणार का? हे सुद्धा पाहावे लागेल.