वाशिममध्ये हॉटेल्समध्ये घरगुती गॅसचा वापर; शासकीय नियम धाब्यावर, पुरवठा विभागाच्या कारवाईची प्रतीक्षा

Domestic LPG Cylinder Commercial Use Hotel Washim : वाशिम शहरासह ग्रामीण भागातील काही हॉटेल्स, नाश्ता सेंटर आणि कॅन्टीनमध्ये व्यावसायिक सिलिंडरऐवजी अनुदानित घरगुती गॅसचा वापर होत असल्याचा आरोप आहे.
 Domestic LPG Cylinder Commercial Use Hotel
Domestic LPG Cylinder Commercial Use Hotel
Published on: 
Updated on: 
  • घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर सुरूच

  • वाशिममधील हॉटेल्स तपासण्याची मागणी

  • ग्राहकांच्या गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती

वाशिम: शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील काही हॉटेल्स, नाश्ता सेंटर आणि कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याची बाब समोर येत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत तुलनेने अधिक असल्याने खर्च वाचविण्यासाठी काही व्यावसायिकांकडून घरगुती वापरासाठी असलेल्या अनुदानित गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कामासाठी वापर केला जात आहे. मात्र, या प्रकाराकडे तालुका पुरवठा विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याने अशाप्रकारांना आळा बसणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केवळ घरगुती स्वयंपाकासाठी अपेक्षित असताना काही हॉटेल्स आणि कॅन्टीनमध्ये त्याचा वापर होत असल्याचे चित्र दिसून येते. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुलनेत घरगुती सिलिंडरचा खर्च कमी पडत असल्याने काही व्यावसायिकांकडून हा मार्ग अवलंबिला जात असल्याचे बोलले जात आहे. शहरातील गर्दीच्या भागातील हॉटेल्स, चहा-नाश्त्याची दुकाने तसेच ग्रामीण भागातील काही गावांमधील कॅन्टीनमध्येही अशाप्रकारांची तपासणी होणे आवश्यक आहे.

 Domestic LPG Cylinder Commercial Use Hotel
Maharashtra News :दुष्काळाविरोधात महाराष्ट्रात पुन्हा जलचळवळ! आमिर खानच्या उपस्थितीत 'वॉटर कप' अभियानाचा शुभारंभ; २० हजार गावांचा सहभाग

या प्रकाराचा परिणाम केवळ शासनाच्या गॅस वितरण व्यवस्थेपुरता मर्यादित राहत नाही, तर सर्वसामान्य ग्राहकांनाही त्याचा अप्रत्यक्ष फटका बसण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलेंडरची मागणी मोठ्या प्रमाणात असताना त्याचा व्यावसायिक वापर होत असल्यास घरगुती ग्राहकांच्या उपलब्धतेवर आणि पुरवठा व्यवस्थेवर ताण निर्माण होऊ शकतो. परिणामी, वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध न होणे, बुकिंगनंतर प्रतीक्षा करावी लागणे आणि ऐनवेळी स्वयंपाकासाठी अडचणी निर्माण होणे, अशा समस्यांना ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर हा नियमांच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. विशेष म्हणजे हॉटेल्स आणि कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंपाकासाठी गॅसचा वापर होत असल्याने घरगुती सिलेंडरचा अशा ठिकाणी वापर करणे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोकादायक ठरू शकते. गर्दीच्या ठिकाणी गॅस गळती किंवा सिलिंडरशी संबंधित दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकीकडे सर्वसामान्य कुटुंबांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर होत असेल, तर पुरवठा यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे तालुका पुरवठा विभाग या प्रकाराची दखल घेऊन प्रत्यक्ष तपासणी करणार का आणि नियमबाह्य वापराला आळा घालणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पुरवठा विभागाने विशेष मोहीम राबविण्याची गरज

वाशिम शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील हॉटेल्स, कॅन्टीन, नाश्ता सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तालुका पुरवठा विभागाने प्रत्यक्ष तपासणी करावी. व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलेंडरचा वापर होत आहे का, याची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन करणा-यांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच घरगुती गैस सिलेंडरचा पुरवठा नियमित आणि वेळेवर होण्यासाठीही आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.

 Domestic LPG Cylinder Commercial Use Hotel
Shooting Competition: पुण्यात नेमबाजीचा महाकुंभ! ७५०० नेमबाजांचा सहभाग