माफियांना रोखण्यासाठी लष्कर बोलवणार का? 'चंद्रभागे'तील बेकायदा वाळू वाहतूकीबाबत नागरिकांचा संतप्त सवाल
पंढरपूर: जिल्हाधिकारी यांच्या गाडीला हुलकावणी दिल्या नंतर पंढरपूर उप विभागीय अधिकारी यांच्यावर हवा आश्या घटनांमुळे वाळू माफियांची दादागिरी किती वाढली असल्याची दिसते तर या आधी वाळू माफियांच्या टिप्परने अनेकांना किड्या मुंग्या सारखे चिरडले आहे. पोलीस महसूल यांच्यातील हप्तेखोरीमुळे वाळू माफियांना रान मोकळे सुटले आहे. |
पंढरपूर भागातून जिल्हाभरात वाळूमाफियांचा घुमाकूळ सुरु असताना महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन हे वाळू माफियांना रोखण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि एसपी साहेब आता वाळू माफियांना रोखण्यासाठी बाहेरून मिलिटरी तरी बोलवा आसा सवाल आता सर्व सामान्य नागरीकातून उपस्तित होऊ लागला आहे.
सध्या बाळूमाफियांकडून चंद्रभागेतील लूट चालू असून दररोज वाळूमाफिया यांच्या शेकडो हायवा धावत असताना कुठेतरी एखादा हायवा पकडून कारवाई करत दिंडोरा पिटला जातो आणि इतर वाळूच्या हायवांना मात्र मोकळे रान करून दिले जाते असाच भक्तांच आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी येथे तीन ठिकाणी जवळपास ५० हून अधिक ट्रैक्टर केनीच्या सहाय्याने दिवसभर नदीच्या पात्रातून वाळू उपसा करतात, आणि रात्र होताच याठिकाणी हायांचा खेळ सुरू होतो.
दिवसभर उपसा केलेली वाळू रात्रीतून जवळपास ३०० हुन अधिक हायवा भरुन वाहतूक केली जाते. त्यामुळे हायवांच्या या सुळसुळाटाने येथील नागरिकांच्या अक्षरशः झोपा उडाल्या आहेत, कोणी विरोध केला तर वाळू माफिया हल्ले करायला घाबरत नाही, म्हणून नागरिक प्रचंड दहशतीखाली राहतात, असे येथील स्थानिक नागरिकांमधून सांगितले जाते. तर या ठिकाणचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी कधी रस्त्यावर उतरून आतापर्यंत कारवाई केल्याचे दिसून येत नाही. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
आठ दिवसांपूर्वीच इसबावी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून वाळमाफियांची दहशत सिध्द झाली आहे. दरम्यान पोलिसांकडून वाळू माफियांना दिल्या जाणाऱ्या पाठबळामुळे वाळू माफियांनी चंद्रभागा नदीच्या पात्रात काेट्यवधीचा महसूल बुडवून वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील कौठळी शिरढोण भटुंबरे गोपाळपूर सुस्ते शेगाव देगाव आंबे चळे ओझेवाडी या ठिकाणी रात्रंदिवस राजरोसपणे वाळु माफिया अवैध वाळू उपसा करीत आहेत. वाळु माफियाकडून आर्थिक गैरव्यवहार असल्यानेच रोज हजारो ब्रासचा अवैध वाळू उपसा चंद्रभागेतून होत आहे. याकडे वरिष्ठ देखील दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाळू मुरमाचे हायवा दिसत नाहीत का?
पंढरपूर शहरातील तसेच तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचे आणि स्पष्ट दिसणारे सीसीटीव्ही कॅमेरे असून यामध्ये कोणीही सुटणार नाही असे असताना पंढरपूर शहरातून वाळूचे आणि मुरुमाचे शेकडो हायवा धावत असताना प्रशासनाला हे कसे दिसत नाही याचे नवल वाटते. या कॅमेऱ्यामध्ये पेट्रोल पंपावरील मशीन मधील पेट्रोल टाकताना आकडे सुद्धा दिसतात असे कॅमेरे असताना मोठे मोठे हायवे दिसत नाहीत का जाणून बुजून यावाचत कारवाई केली जात नाही अशी चर्चा होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाहिले तर अनेक हायवा दिसतील आणि प्रशासनाला बसल्या जागेवर मोठ्या प्रमाणात कारवाया करता येतील मात्र पोलीस आणि महसूल प्रशासन हायवावर कारवाया करण्याबाबत कोणत्याही प्रकारचे मोहीम राबवत नसल्याचे दिसून येत आहे.
वाळूच्या धंद्यात पोलिसांचेही हायवा
एकीकडे वाळू माफिया विरोधात पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारवाई होत असताना मात्र वाळूच्या धंद्यामध्ये अनेक पोलिसांचे हावया असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. चीस ते पंचवीस पोलिसांचे हायवा असल्याचे बोलले जात आहे. पोलीस मुख्यालय व इतर विभागात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या नातेवाईकांच्या नावावर तुम्ही खा आणि आम्हालाही खाऊ घाला असाच प्रकार सुरू आहे. रात्रीच्या वेळी हे पोलीस कर्मचारी ड्युटी सोडून हायवाच्या मागे असतात. पोलीस असल्याचा फायदा घेवून ते वाळूच्या धंद्यात लाखो रुपये कमवतात. पोलीस अधीक्षक त्या पोलीस कर्मचाऱ्याचे वाळूचे हायवा पकडतील का? की त्यांना अभय देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.