ठाणे : बहिण भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण पुढच्या महिन्यात आहे. असे असताना आतापासून बाजारात विविध प्रकारच्या आकाराच्या राख्या दाखल झाल्या आहेत. सध्या राजकारणात एकनाथ शिंदे हे नाव गाजत असून त्यांच्या छबीचा वापर करून आपले मुख्यमंत्री या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत.
आमच्या कुटुंबाचे ४० वर्षे ठाण्यात वास्तव असून १२ वर्षे राखी बनवतो. माझा जन्म ठाण्यातला आणि आपले मुख्यमंत्री देखील ठाण्यातले या भावनेतून ‘आपले मुख्यमंत्री’ एकनाथ शिंदे अशा प्रकारच्या पाच डझन राख्या सध्या विक्रीसाठी बनवल्या आहेत. १२ वर्षे हे या व्यावसायत असून सात वर्षे माझी आई कल्पना सोबत घरीच राख्या तयार करून विकत होतो. परंतू मागील तिन वर्षांपासून ज्या ठिकाणी गाळा उपलब्ध होतो तिथे दुकान थाटतो. व्यवसायाचे ठिकाण निश्चित नसल्याने आम्ही ग्राहकांची नाव, नंबर माहितीची नोंद वही ठेवली असून या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधतो. या घडीला आमचे पाच हजार गिन्हाईक राखीच्या प्रेमळ धाग्याने बांधलेले असल्याचे येथील व्यावसायिक विराग याने सांगितले.
[read_also content=”दोन वर्षांपासून शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत, आमदार डॉ. भोयर यांनी दिले उपमुख्यमंत्र्यांना निवेदन https://www.navarashtra.com/maharashtra/farmers-have-been-waiting-for-compensation-for-two-years-mla-dr-bhoyer-gave-a-statement-to-the-deputy-chief-minister-nraa-306781.html”]
तर जानेवारी महिन्यापासून आमचे हौशी कारागीर राखी बनवायला घेतात. तत्पूर्वी भुलेश्वर, अहमदाबाद, राजकोट येथून राखी बांधायचे साहित्य आणतात असेही विराग सांगतात. श्रावण महिना लागला की रंगीबेरंगी विविध आकाराच्या राख्यांचा बाजार बहरण्यास सुरवात होते. पण यंदा राज्यातील राजकीय रंगमंचावर ठाण्याचे मुख्यमंत्री विराजमान झाले आणि बाजारात चक्क आनंदमठापासून काही अंतरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध मुद्रा असणाऱ्या छटा रेखाटलेल्या राख्या बाजारात दिसत आहेत. राखी पौर्णिमा सण जसजसा जवळ येतो तसतसे बाजारात गेल्यावर्षी कोणता ट्रेण्ड होता. यावर्षी कोणत्या राख्यांचा बोलबाला अशी कुजबूज महिला तसेच बच्चे कंपनीत सुरु असते. ठाणेकर मुख्यमंत्र्यांचा आपले मुख्यमंत्री ट्रेंड नावारूपाला आला. भाऊ बहिण यांच्या प्रेमाचा रक्षणाचा प्रतीक असलेला रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा ११ ऑगस्ट रोजी आहे. या निमित्ताने लहानांपासून ते मोठ्यांसाठी राख्या विक्रीसाठी आहेत. यामध्ये एक रुपयाच्या रेशमी गोंडे यापासून ते सोने चांदीच्या १० हजार रूपयापर्यंतची राखी आहे. तर गुजराती मारवाडी समाजात लुम्बा नावाची राखी बहिण भावाबरोबर वहिनीलादेखील बांधण्याची प्रथा असून आमच्याकडे ३० रुपयांपासून २००रु लुम्बा राखी तसेच कपल्स नावाची राख्या आहेत. तर लहान मुलांसाठी डिस्कोलाईट, टेडी बिअर, रोनाल्ड डक, सुपरमैन, बॅटसमन राख्या उपलब्ध असल्याचे विराग याने सांगितले.
[read_also content=”राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज https://www.navarashtra.com/maharashtra/the-weather-department-has-predicted-heavy-rains-in-the-state-for-the-next-four-days-nrps-306755.html”]