मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणामुळे (Telephone Tapping) चर्चेत आलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. एसीसीकडून शुक्ला यांच्या पोलीस महासंचालकपदी बढतीला मंजुरी देण्यात आली. रश्मी शुक्ला यांच्यासह 20 आयपीएस अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना सरकारने पोलीस महासंचालकपदी बढती दिली आहे.
दिल्लीत एसीसीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत रश्मी शुक्ला यांच्यासह अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांनाही बढती मिळाली. रश्मी शुक्ला या राज्यातील नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. तेव्हा महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता.
रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून गुप्तवार्ता विभागाने हे फोन टॅपिंग केल्याचे आरोप होते.