मुंबई : गुजरात जामनगर (Gujarat, Jamnagar) येथील प्राणीसंग्रहालयाचा (Zoo) मार्ग मोकळा झाला आहे. ग्रीन झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’ सोसायटी (GZRRC) या संग्रहालयाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
हे एक प्राणी संग्रहालय असून नोंदणीकृत प्राणी संवर्धन केंद्रही आहे यात कोणताही वाद नाही. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (Central Zoo Authority) त्यांना परदेशातून प्राणी आणून येथे ठेवण्यास परवानगी देताना कोणतीही कायदेशीर चूक केली नसल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे(The court also stated in the order that no legal error was committed while allowing animals to be brought from abroad and kept here).
याचिकाकर्त्यांनी जनहित याचिका (Public Interest Litigation by the Petitioners) दाखल करताना योग्य अभ्यास आणि पाठपुरावा केल्याचे आढळून येत नाही. तसेच याचिकाकर्ते या क्षेत्रातील विशेषज्ञ नाहीत. त्यांनी प्रसार माध्यमांच्या आधारे याचिका केली आहे. प्रसार माध्यमांनी केलेला अहवालही कोणत्या तज्ज्ञ व्यक्तीने केलेला नाही. त्यामुळे सर्व तथ्य पाहता या प्रकरणात काही गैर व्यवहार झाला असल्याचे निष्पन्न होत नाहीं. त्यामुळे याचिका ही तथ्यहीन असल्याचे नमूद करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
ग्रीन झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर (Green Zoological Rescue and Rehabilitation Centre) ही एक खासगी संस्था (Private Organization) असून तिला जामनगरमध्ये खासगी प्राणी संग्रहालय उघडण्यास आणि देश-विदेशातून प्राणी आणण्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सेंटरला परवानगी दिली असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता.
मात्र, त्या याचिकेला ग्रीन झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरने विरोध करत प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. याचिकाकर्त्याने जे ऐकले त्या आधारावर ही याचिका दाखल केली आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊनच त्यांना परवानगी दिली आहे. येथील सर्व प्राण्यांच्या उपचारासाठी चोख व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते.






