शेतकऱ्यांच्या फळबागांची कराडच्या कृषी प्रदर्शनात चमक; कोणत्या फळाला मिळाला पहिला क्रमांक?

कराडच्या २१ व्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात फळपिकांची स्पर्धा रंगली. डाळिंब, चिकू आणि ड्रॅगन फ्रुटला विभागून प्रथम क्रमांक मिळाला असून, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध फळपिकांचे नमुने सादर केले होते.
karad-agriculture-exhibition-fruit-crop-competition-winners-list.jpg
कराडच्या २१ व्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात फळपिकांची स्पर्धा रंगली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Published on: 
Updated on: 
  • कराडमध्ये पार पडले २१ वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

  • शेतकऱ्यांच्या कष्टातून फुललेली फळबागांची समृद्धी आली दिसून

  • कृषी प्रदर्शनात कोणी मिळवला पहिला क्रमांक

Karad News : कराड प्रतिनिधी : फळपिकांचे दर्जेदार उत्पादन, आधुनिक लागवड तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या कष्टातून फुललेली फळबागांची समृद्धी यांचे दर्शन कराडच्या कृषी प्रदर्शनात पाहायला मिळाले. २१ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवात शुक्रवारी कृषी विभागाच्या स्टॉलवर आयोजित फळपिके प्रदर्शन व स्पर्धेत धुमाळवाडीच्या दत्तात्रय धुमाळे यांच्या डाळिंबाला, शिरळ येथील रमेश कुंभार यांच्या चिकूला आणि वडगाव हवेलीच्या प्रताप जगताप यांच्या ड्रॅगन फ्रुटला विभागून प्रथम क्रमांक मिळाला.

या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी डाळिंब, चिकू, ड्रॅगन फ्रुट, आवळा, कवठ, पेरू, सीताफळ आणि स्टार फ्रुट, पपई यांसारख्या विविध फळपिकांचे नमुने सादर केले होते. फळांची गुणवत्ता, आकार, रंग, दर्जा आणि उत्पादनाची वैशिष्ट्ये यांचा विचार करून परीक्षकांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक (विभागून) - दत्तात्रय भिमराव धुमाळ – डाळिंब, धुमाळवाडी, ता. फलटण, जि. सातारा., रमेश तुकाराम कुंभार – चिकू, शिरळ, ता. पाटण, जि. सातारा, प्रताप धोंडीराम जगताप – ड्रॅगन फ्रुट, वडगाव हवेली, ता. कराड, जि. सातारा.

द्वितीय क्रमांक (विभागून) - संदिप महादेव पवार – आवळा, धुमाळवाडी, ता. फलटण, जि. सातारा, शिवाजी सिंमनाथ सोनवणे – कवठ, शिंदेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा, संभाजी परबती इंगवले – ड्रॅगन फ्रुट, रिसवड, ता. कराड, जि. सातारा.

तृतीय क्रमांक (विभागून) - प्रमोद उत्तम नलवडे – पेरू, पार्ले, ता. कराड, जि. सातारा., यशोदा निवासराव पाटील – सीताफळ, पाडळी, ता. कराड, जि. सातारा., ऋषिकेश जयसिंग ढाणे – स्टार फ्रुट, पाडळी निनाम, जि. सातारा.

पुण्यानंतर नाशिकच्या महापालिकेचा फ्लेक्स लावणाऱ्यांना दणका! होर्डिंग्जवरील दादा, भाऊ, साहेब रस्त्यावर

उत्तेजनार्थ पारितोषिके - जयश्री माणिकराव पाटील – सीताफळ, घोणशी, ता. कराड., राधिका दादासाहेब धोकटे – सीताफळ, विरवडे, ता. कराड, जि. सातारा.

या स्पर्धेसाठी कराडच्या उद्यानविद्या कृषी महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. कीर्ती भांगरे, डॉ. प्रियांका जाधव, डॉ. श्वेता धवल, मुंडे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रभारी अधिकारी डॉ. एच. सोनवले, कालवडे कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ विशाल महाजन, कराडचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी आर. एम. मुल्ला, सातारा जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी कुंडलिक माळवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

गोदाघाटावर नेमकं काय सापडलं? पुरातन मंदिराचे अवशेष मिळताच खोदकाम थांबवले

तसेच तळबीड (ता. कराड) येथील कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कारप्राप्त शेतकरी सुधीर चिवटे, करवडी (ता. कराड) येथील जे. के. बसु सेंद्रिय शेती पुरस्कारप्राप्त शेतकरी राजन धोकटे, खंडाळा पंचायत समितीचे कृषी अधिकारी बी. एस. बोडरे, खटाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी बी. जी. चव्हाण आणि माण पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी एस. एन. ढाणे यांनीही परीक्षक म्हणून काम पाहिले.

या सर्वांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कृषी अधिकारी संतोष कदम, पवन गायकवाड आणि संतोष किरवे यांनी सहकार्य केले.

Q

कराडच्या कृषी प्रदर्शनात फळपिके स्पर्धेत कोणत्या फळांना प्रथम क्रमांक मिळाला?

A

डाळिंब, चिकू आणि ड्रॅगन फ्रुट या तीन फळपिकांना विभागून प्रथम क्रमांक मिळाला.

Q

फळपिके स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारे शेतकरी कोण आहेत?

A

धुमाळवाडीचे दत्तात्रय धुमाळे (डाळिंब), शिरळचे रमेश कुंभार (चिकू) आणि वडगाव हवेलीचे प्रताप जगताप (ड्रॅगन फ्रुट) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

Q

कराडचे कृषी प्रदर्शन कितवे होते?

A

कराडमध्ये २१ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.