कार्वे (ता. कराड) येथील एका मद्यधुंद डॉक्टरने भरधाव कार चालवित दोन दुचाकींना उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात दोन महिला व एक पुरुष असे तीन जण जखमी झाले आहेत.
उंब्रज व परिसरात साखर कारखान्यांमुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दरवर्षी वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहत होता. या पुलामुळे उंब्रजसह सुमारे 35 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.
मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास जमीर खान यांना त्यांचा भाऊ समीर याने फोन करून दुकानातून धूर येत असल्याचे सांगितले. त्यामुळे जमीर खान हे तातडीने दुकानाकडे गेले.
कल्याणी व गौरवकुमार ब्रह्मभट दोघे लंडनला विमानाने निघाले होते. मात्र, या प्रवासादरम्यान त्यांनी आपला मुलगा व मुलीला घरीच कल्याणीच्या सासू-सासऱ्यांकडे ठेवले होते.
गेल्या 15 दिवसांपासून कराड तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांशी भागात वादळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. याचा ग्रामीण भागातील शेती मशागतींच्या कामांवर मोठा परिणाम झाला असून, ही कामे खोळंबली आहेत.
कितीही मोठे संकट आले तरीही कोणत्याही आमिषाला, दबाव आणि दडपणाला बळी न पडता काँग्रेसला साथ देणारे नामदेव पाटील यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते ही काँग्रेसची शक्ती आहे.
पीव्हीसी व अन्य प्रकारचे पाईप व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने आकाशात मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट उसळत होते. हे धुरांचे लोट पाहून याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंढे (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड- पाटण मार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.
कृष्णा कॅनॉलपासून रस्त्यात दिसेल त्या वाहनाला धडक देत कराड शहरात आलेल्या इको कारमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. बालाजी हॉस्पिटलसमोरील परिसरात इको कारसह तीन अपघातग्रस्त दुचाकी पडल्या होत्या.
Sahyadri Cooperative Sugar Election 2025 : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत झाल्याने उत्साह शिगेला पोहचला होता. मतदान देखील विक्रमी टक्क्यांनी झाले आहे.
न्यायाधीश जोशी यांनी सर्वांना बाजूला होण्यास सांगितले आणि खालून कांदा आणण्यास सांगितले. सदरील व्यक्तीच्या नाकाला कांदा लावून त्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
Sahyadri Sugar Factory ESP boiler testing explosion : सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात भीषण घटना घडली आहे. यामध्ये ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना भीषण स्फोट झाल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
सेगमेंट खाली कोसळल्यामुळे जोरदार आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्गावरून प्रवास करणारे अनेक वाहनचालकही त्याठिकाणी थांबले होते.
आतापर्यंत बिबट्याचं अस्तित्व आहे का नाही, याबाबत ग्रामस्थांच्यात शंका होती. तर्कवितर्क लढवले जात होते. गुरुवारी कांबीरवाडीत बिबट्याने शेळी चारावयास गेलेल्या महिलेच्या देखतच शेळीवर हल्ला केला.