गोदाघाटावर नेमकं काय सापडलं? पुरातन मंदिराचे अवशेष मिळताच खोदकाम थांबवले

नाशिकमधील पंचवटी येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खोदकाम करताना पुरातन मंदिर आढळल्याने पुरातत्व विभागाने महापालिका विभागाने नोटीस बजावली आहे. विभागाकडून पाहणी केली जाणार आहे.
nashik panchavati old mandir find shivlinga.jpg
नाशिकमध्ये पंचवटीमध्ये खोदकाम करताना पुरातन मंदिर सापडल्याने पुरात्वत विभागाने थांबवले काम (फोटो - नवभारत)
Published on: 
Updated on: 
  • नाशिकमध्ये खोदकाम करताना पुरातन मंदिराचे अवशेष

  • शिवलिंग, नंदी व मंदिराचे अवशेष सापडल्याने पुरातत्व विभागाने थांबवले काम

  • पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार चाचपणी

Nashik News : नाशिक :  कुंभमेळ्यानिमित्त गोदाघाटावर सुरू असलेल्या रामकाल पथ प्रकल्पांतर्गत दुतोंड्या मारूती मंदिराच्या मागील बाजुस सुरू असलेल्या खोदकामात पुरातन शिवलिंग, नंदी व मंदिराचे अवशेष सापडल्याच्या घटनेची पुरातत्व खात्याने गंभीर दखल घेतली असून, या ठिकाणची पुरातत्व खात्याकडून पाहणी झाल्याशिवाय संबंधित अवशेषांच्या परिसरात सुरू असलेले तोडकाम व खोदकाम धांबविण्यात यावे अशी सुचना मनपाच्या शहर अभियंत्यांना पत्राद्वारे केली आहे.

सोमवारी (दि.२३) हा प्रकार उघडकीस आला होता. खोदकाम सुरू असताना भुयारी मार्ग दिसला व आत डोकावून काही भाविकांनी पाहिले असता तेथे शिवलिंग, नंदी व मंदिराचे काही अवशेष आढळून आले होते. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली तसेच खोदकाम तातडीने थांबवण्यात आले होते. खोदकामात पुरातन शिवलिंग तसेच मंदिराचे अवशेष सापडल्याने हा भाविकांच्या आस्थेचा विषय बनला आहे.

तसेच खोदकामामध्ये सापडलेल्या पुरातन मंदिरासंदर्भात पुरातत्व खात्याला माहिती देण्यात आली होती. जाणकारांच्या मते सन १९१७ च्या सिटी सर्वे ऐतिहासिक नकाशामध्ये सदम परिसरात पाच प्राचीन मंदिरांची नोंद असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे अवेशष नक्की किती वर्षांचे आहेत? या ठिकाणी खोदकामात अजून काही सापडते का? याची चाचपणी पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार आहे.

'हे निर्लज्जपणाचे लक्षण...', रोहित पवारांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

दरम्यान, पुरातत्ववभागाने काम थांबविण्याचे आदेश दिल्याने आता पुन्हा हे काम कधी सुरू होणार? याची प्रशासनाला चिंता लागली आहे. सिंहस्थ कुंभमेळा जवळ येऊ लागल्याने विकासकामे उरकण्यासाठी प्रशासनाकडून घाई केली जात आहे. यामध्ये आता हे पुरातत्व विभागाचे आदेश आल्याने अडचण निर्माण झाली आहे.

पुणे महापालिकेचा थेट महापौरांनाच टोला! मंजुषा नागपुरेंच्या फ्लेक्सचा फोटो शेअर करत म्हणाले...

पुरातत्व खात्याने पंचवटीमध्ये सापडलेल्या या मंदिराच्या अवशेषांची दखल घेत प्राचीन शिवलिंग, नंदी व मंदिरांच्या अवशेषांची जोपर्यंत पुरातत्व विभागामार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी होत नाही, तोपर्यंत या परिसरात सुरू असलेले तोडकाम व खोदकाम भांबविण्यात यावे. तसेच यापुढे पंचवटी परिसरात सुरू असलेल्या कामादरम्यान इतर पुरातने मंदिराचे अवशेष आढळून आल्यास तात्काळ काम थांबवून या विभागास कळविण्यात यावे व स्थळपाहणी होईपर्यंत संबंधित अवशेषांच्या परिसरात सुरू असलेले तोडकाम व खोदकाम थांबवण्यात यावे, अशी सूचना पुरात्वत विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी मनपा शहर अभियंत्यांना केली आहे.

Q

नाशिकमध्ये पुरातन मंदिराचे अवशेष कुठे सापडले?

A

नाशिकमधील गोदाघाट परिसरात सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पुरातन मंदिराचे अवशेष आढळले.

Q

मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर प्रशासनाने काय निर्णय घेतला?

A

पुरातन मंदिराचे अवशेष आढळल्याने गोदाघाटावरील खोदकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले.

Q

गोदाघाटावरील खोदकाम का थांबवण्यात आले?

A

खोदकामादरम्यान ऐतिहासिक महत्त्व असलेले पुरातन मंदिराचे अवशेष सापडल्याने त्यांचे जतन आणि पुढील तपासणी करण्याच्या दृष्टीने खोदकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले.