फोटो सौजन्य AI
पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील सायडोंगर येथे टोरंट कंपनीकडून प्रस्तावित हायड्रॉलिक प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्जतला येण्याची चर्चा आहे. भालिवडी ग्रामपंचायत हद्दीतील पुलाची वाडी आणि लाखाची वाडी येथील शासकीय जमिनीवर भूमिपूजन सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Senior Citizen Rehabilitation : MDL च्या CSR उपक्रमांतर्गत वांद्रे येथे PMD-VK केंद्राचे उद्घाटन
३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ते कर्जत तालुक्याला भेट देणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आंबिवली फाटा ते भीमाशंकर घाट रस्त्यालगत नागेरे फाट्यावरून सावळे गावाकडे जाणाऱ्या मार्गाचे काम सुरू झाले आहे. यापूर्वी हा रस्ता प्रामुख्याने पायी जाण्यासाठी आणि बैलगाडीच्या वापरासाठी होता. आता त्याचे नव्याने बांधकाम केले जात आहे.
बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश
टोरंट कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे. हा विरोध कायम असताना भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे. पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्यासाठी हेलिपॅडची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसाठीही स्वतंत्र हेलिपॅड उभारण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान खरोखरच कर्जतमध्ये येणार का आणि शेतकऱ्यांच्या विरोधाचे काय होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.






