इचलकरंजी : इचलकरंजीपासून जवळच असलेल्या तारदाळ येथील आवाडे टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग (Fire in Chemical factory) लागली. स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. फॅक्टरीला आग लागल्यामुळे कोट्यवधीचे रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
#WATCH महाराष्ट्र: कोल्हापुर के एक केमिकल फैक्ट्री में आग लगी। मौके पर दमकल की चार गाड़ियां मौजूद हैं। pic.twitter.com/Brx92o6ruN
— ANI_HindiNews (@AHindinews) January 24, 2022
सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. सदरची आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीचे धूराचे लोट मोठे असल्याने आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वारे सुटल्याने धुराचे लोट आकाशात पसरल्याने एक प्रकारचा काळोखच निर्माण झाला होता.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मिलला लागलेल्या या अचानक आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.