मुंबई : महानगरात पर्जन्य जलवाहिन्या (Rainwater Channels), मलवाहिन्यांवर (Sewers) असणारे झाकण (Lid) चोरुन नेल्याचे प्रकार अधूनमधून निदर्शनास येतात. या चोऱ्या रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न (BMC Efforts) देखील केले जातात सध्या अशाच झाकणांना सायरन (Siren) लावण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे मात्र तोपर्यंत चोरट्यांकडून झाकण चोरीच्या घटना रोखण्याचे आवाहन पालिकेसमोर उभे ठाकले आहे
बुधवारी अशाच प्रकारची घटना विलेपार्लेमध्ये (VileParle) भल्या पहाटे घडली त्यात पर्जन्य जलवाहिनीचे झाकण चोरुन नेण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न झाला. मात्र खासगी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने (Private Society Security Guard) चोरट्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे या सुरक्षारक्षकाचा के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी सत्कार केला (K-West Division Assistant Commissioner Dr. Prithviraj Chauhan felicitated).
[read_also content=”लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बांदा येथे दलित महिलेवर बलात्कार, गावातीलच तरुणाने डाव साधला, केला गुन्हा https://www.navarashtra.com/crime/dalit-woman-raped-by-village-youth-in-banda-uttar-pradesh-crime-nrvb-361103.html”]
के-पश्चिम विभागातील विलेपार्ले (पश्चिम) परिसरात दर्शन सोसायटी, १६ फ्रेंडस को-ऑप हौसिंग सोसायटी, एन.एस. मार्ग क्रमांक ६, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू या ठिकाणी रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी भल्या पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अज्ञात २ चोरटे एका रिक्षातून चालकासह आले. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पर्जन्य जलवाहिनीचे झाकण चोरी करण्याचा ते प्रयत्न करत असतानाच आवाज ऐकून सोसायटीचे सुरक्षा रक्षक प्रकाश झाला धावत बाहेर आले. त्याला पाहताच चोरट्यांनी रिक्षातून पळ काढला. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याआधारे महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभागाने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
[read_also content=”२०० महिलांसोबत रात्री केला रंगेलपणा, दिला वेदनादायक मृत्यू, वर्दीच्या नावाखाली गुन्हे करणारा ‘मानवी क्रूरकर्मा’ https://www.navarashtra.com/crime/horrible-criminal-russian-serial-killer-mikhail-popkov-werewolf-who-worked-in-police-killed-200-women-in-nights-nrvb-361094.html”]
प्रकाश यांच्या सतर्कतेमुळे पर्जन्य जलवाहिनीचे झाकण चोरीला जाण्याचा प्रकार टळला. परिणामी, भविष्यातील संभाव्य दुर्घटना टळली आहे. या सतर्कतेबद्दल कौतुक म्हणून के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. चौहान यांनी प्रकाश यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कार केला. कर्तव्यदक्ष व सतर्क नागरिकांच्या सहभागाने महानगरपालिकेच्या कामकाजाला प्रोत्साहन मिळते, अशा शब्दात सहाय्यक आयुक्तांनी गौरव केला.