Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्याला बंदुक दाखवणं भोवलं; मनोरमा खेडकर यांना अटक; पुणे पोलिसांनी महाडमधून ठोकल्या बेड्या

IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी महाडमधून मनोरमा खेडकर यांना बेड्या ठोकल्या आहेत. शेतकऱ्याला बंदुकीचा धाव दाखवल्याप्रकरणी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली आहे. स्थानिक पोलीस स्थानकामध्ये याची नोंद करून पोलीस त्यांना पुण्याला घेऊन जात आहेत. तिथे त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2024 | 11:09 AM
मनोरमा खेडकर यांना अटक

मनोरमा खेडकर यांना अटक

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी महाडमधून मनोरमा खेडकर यांना बेड्या ठोकल्या आहेत. शेतकऱ्याला बंदुकीचा धाव दाखवल्याप्रकरणी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत असल्याचं दिसत होतं. याप्रकरणी आता पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून मनोरमा खेडकर यांना महाडमधून अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांची पुण्यातून थेट बदली वाशीमला करण्यात आली. याठिकाणी त्यांनी कारभार स्वीकारला असून त्यांच्याबाबत रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. IAS पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात असतानाच आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा देखील एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये त्या हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यावर दमदाटी करत असल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याने खेडकर दाम्प्त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर व दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यापासून मनोरमा खेडकर बेपत्ता होत्या.

याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी मनोरमा यांना कारणे नोटीस पाठविली होती. ‘तुम्ही शस्त्राचा दुरूपयोग करून परवानाविषयक अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये, याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असून, 10 दिवसांत लेखी म्हणणे मांडावे, तुम्ही नोटीसला उत्तर न दिल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल.’ अशा आशयाची नोटीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केली होती. तसेच या घटनेनंतर पुणे पोलीस मनोरमा खेडकर यांचा शोध घेत होते. मनोरमा खेडकर महाडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार आज पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस स्थानकामध्ये याची नोंद करण्यात आली असून पोलीस त्यांना पुण्याला घेऊन जात आहेत. तिथे त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही जमीन मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातली असल्याचं सांगितलं जात आहे. धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला, असं सांगितलं जात आहे. या वादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मला कायदा सांगू नका, सातबाऱ्यावर माझं नाव आहे, असं मनोरमा खेडकर शेतकऱ्यांना दरडावून सांगताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांना ओरडत असताना त्यांनी शेतकऱ्यावर बंदूक देखील रोखली होती. त्यांचा रिव्हॉल्व्हर रोखून दमबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Web Title: Manorama khedkar arrested for showing gun to farmer pune police removed shackles from mahad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 11:07 AM

Topics:  

  • Manorama Khedkar

संबंधित बातम्या

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा प्रताप….; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर सोडलं कुत्रं, पुण्यात गुन्हा दाखल
1

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा प्रताप….; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर सोडलं कुत्रं, पुण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.