फोटो सौजन्य सोशल मिडिया
लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या कैंट – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट विशेष गाड्या (साप्ताहिक) – (२४ सेवा) यामध्ये गाडी क्रमांक 01045 ही साप्ताहिक विशेष गाडी दर सोमवारी आणि शुक्रवारी दिनांक १९.१०.२०२६ ते दिनांक २७.११.२०२६ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०७:३५ वाजता सुटेल आणि अयोध्या कैंट येथे दुसऱ्या दिवशी १०:१५ वाजता पोहोचेल.
रिक्षाचा धक्का लागला अन् थेट खड्ड्यात पडले! पुण्यात 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
गाडी क्रमांक 01046 ही साप्ताहिक विशेष गाडी दर मंगळवारी आणि शनिवारी दिनांक २०.१०.२०२६ ते दिनांक २८.११.२०२६ या कालावधीत अयोध्या कैंट येथून १३:५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १७:१५ वाजता पोहोचेल. या सर्व गाड्या कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, प्रतापगड आणि सुलतानपुर. येथे थांबतील. याची सर्व गाड्याची संरचना (अमृत भारत रेक) ८ शयनयान, ११ सामान्य द्वितीय श्रेणी, १ पॅन्ट्री कार आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असेल.
आरक्षण विशेष गाडी क्रमांक 01045 साठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अनारक्षित डब्यांचे तिकीट बुकिंग सामान्य दरांसह ‘यूटीएस’ प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकिटांच्या बुकिंगसाठी ‘रेलवन’ ॲपचाही वापर करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यावरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करता येईल.






