मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे, तर कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच मान्सून परतीच्या मार्गावर असून, राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या (Shiv Sena MLA Disqualification Case) वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे.
निवडणूक आयोगाने राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीची तारीख बदलून 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबर केली. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
इस्रायलमध्ये लेबनॉन बॉर्डवरून घुसखोरी, 3 शहरांत अलर्ट जारी:अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सरकारचे ‘ऑपरेशन अजय’ सुरू
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
मान्सून परतीच्या मार्गावर असून, राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री यांचे गुरुवार दि.१२ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे कार्यक्रम
दुपारी ०१.३० वा.
पुणे महानगर पालिकेतून वगळण्यात आलेल्या देवाची उरुळी व फुरसुंगी या गावाच्या प्रश्नांसंदर्भात बैठक.
● स्थळ :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
दुपारी ०२.०० वा.
मौजे सोनोशी ता. इगतपूरी, जि. नाशिक येथील आद्य क्रांतिकार राघोजी यांच्या स्मारकासंदर्भात बैठक.
● स्थळ :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
भाजपा नेते आमदार नितेश राणे यांची आज 12 ऑक्टोबर 2023 रोजी, सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद
प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत
मुंबई मराठी पत्रकार संघ. पत्रकार परिषदा / कार्यक्रम खालीलप्रमाणे.
०१) नाव – महाराष्ट्र टॅक्सी/रिक्षा/कॅब चालक/डिलिव्हरी संयुक्त कृती समिती.
वेळ – दुपारी – ०३.०० वाजता.
विषय – मागणी बाबत होणारे बेमुदत आंदोलन.
पत्रकार परिषद / कार्यक्रम घेणार – ऍड. उदय कुमार आंबोणकर.
०२) नाव – संयुक्त कला मंच, नागपूर.
तारीख – १२ ऑक्टोबर २०२३ – वार्ताहर कक्ष.
वेळ – दुपारी – ०४.०० वाजता.
विषय – “रक्त पुष्प” नाटकासंदर्भात.
पत्रकार परिषद / कार्यक्रम घेणार – डॉ. संयुक्ता थोरात.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारताने अफगानिस्तानचा ८ विकेटनी पराभव करत, सलग दुसरा विजय मिळवला आहे.
आज विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे.