पाणी कपातीनंतर आता राज्यात भारनियमनचे संकट; मागणी वाढती पण पुरवठा कमी (File Photo)
राज्यभरात 3 ऑक्टोबरपासून जास्त मागणी असलेल्या संध्याकाळच्या वेळात भारनियमन करण्यात येत आहे. गेल्या बुधवारपासून (दि.७) सायंकाळबरोबरच सकाळी सहा व सातलाही भारनियमन करण्यात आले, तर शनिवारी, सुमारे ७५० मेगावॉट तुटीमुळे भारनियमन झाले. त्यात वाढ होऊन गुरुवारी (दि.८) वीजतूट एक हजार मेगावॉटहून अधिक तर शुक्रवारी (दि.९) १८०० मेगावॉटहून अधिक होती. महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राने (एसएलडीसी) किती भारनियमन झाले, याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
Mumbai Water Cut 2026 : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! BMC चा इशारा; गैरवापर केल्यास थेट कारवाई
एसएलडीसीच्या या आकडेवारीनुसार, राज्यभरात गेल्या शनिवारपासून (दि.३) जास्त मागणी असलेल्या संध्याकाळच्या वेळात भारनियमन करण्यात येत आहे. राज्यातील दररोजची विजेची मागणी सुमारे 30 हजार मेगावॉटवर पोहोचली आहे. त्यातील सुमारे 25 हजार मेगावॉट विजेची मागणी ‘महावितरण’च्या ग्राहकांकडून, तर सुमारे ४ हजार मेगावॉट विजेची मागणी मुंबईतील ग्राहकांकडून आहे. मात्र, मुंबईत भारनियमन करण्यात येत नाही. तिथे वीजपुरवठा करणार्या अदानी, बेस्ट, टाटा या कंपन्यांना महावितरणकडून अतिरिक्त विजेचा पुरवठा करण्यात येतो.
पुण्यात अखेर पाणी कपात होणार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार महापालिकेने येत्या गुरुवारपासून (ता.15) आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नियमावली लागू केली आहे. जलसंपदा विभागाने शहराच्या पाणी पुरवठ्यात 40 टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात केल्यास पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे ठरवले आहे.






