वाल्मिक कराडचा आणखी एक क्रूर चेहरा उघड; मुंडे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शीचाही खून
मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या कारागृहात असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे कारनामे संपता संपत नाहीयेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराडच्या गैरकृत्यांवर प्रकाश टाकत अनेक धक्कादायक खुलासे केले. अशातच वाल्मिक कराडचा नवा कारनामा समोर आला आहे. बीडमधील कराडच्या निकटवर्तीयाचा चक्क देशी दारूचा कारखाना असल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अंबाजोगाई येथील बूटनाथ तलाव परिसरात असलेल्या एका देशी दारू उत्पादन कारखान्याचा व्हिडीओ समोर आणला आहे. हा कारखाना वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाचा असून येथे बेकायदेशीरपणे दारू तयार केली जात असल्याचा आरोपही दमानिया यांनी केला आहे. तसेच, उत्पादन शुल्क विभागातील रंगनाथ जगताप या अधिकाऱ्याने कारवाई करून हा कारखाना उदध्वस्त केला होता. मात्र, कारखाना वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाचा असल्याने यावर पुढील कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. याउलट आरोपींना मोकाट सोडण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर JIO लाँच करणार हे खास फीचर, युजर्सना मिळणार बचत करण्याची
दमानियांनी यासंबंधीचा व्हिडीओ असल्याचे जाहीर करत बीड पोलिसांकडे तातडीने या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. संबंधित प्रकरणातील दुर्लक्ष हे गंभीर असून प्रशासनाने याची चौकशी करून कठोर पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दुसरीकडे वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडून मकोका न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड फरार असतानाच त्याची शंभरहून अधिक बँक खाती गोठवण्यात आली होती. त्यानंतर आता त्याच्या बँक खात्यांसह इतर संपत्तीही जप्त करण्यासाठी एसआयटीकडून हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाने परवानगी देताच, त्याची सर्व संपत्ती जप्त केली जाईल.
Today Horoscope: या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता
बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेला दोन महिने होत आले असून यावरुन जोरदार राजकारण देखील रंगले आहे. यामध्ये आरोपी वाल्मीक कराड याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र यावरुन संशय व्यक्त केला जात आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील याबाबत संशय व्यक्त केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मास्टर माईंड आरोपी वाल्मीक कराड आणि अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यामधील अर्थिक व्यवहार देखील समोर आणले आहेत. अंजली दमानिया म्हणाल्या की, “आपण ज्या एफआयआरबाबत आपण बोलत होते तो हाच एफआयआर आहे. मी सांगितलं होतं की यावर गंभीर गुन्हे होते. पण चार्जशीटबाबत विचारणा केली तर पुराव्याअभावी नाव वगळली असे सांगण्यात आले, वाल्मिकी आण्णा तिथे नव्हते असं सांगण्यात आले, पुर्ण चौकशी झाली नाही, डीजींकडे पत्र दिले आहे. त्यात ही केस रिओपन करा अशी मागणी आपण केली आहे, ज्याच्यावर हल्ला झाला तोच जेलमध्ये सडत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येत आहे” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.