

करीरोड येथे 98 कोटींचा नवा रेल्वे डेपो उभारणार.
डिसेंबर 2028 पर्यंत डेपो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
दादरहून दररोज 5 ते 6 नव्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू होण्याची शक्यता.
मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करीरोड आणि लोअर परळ स्थानकादरम्यान 98 कोटी रुपये खर्च करून नवीन कोचिंग डेपो उभारण्याचं ठरलं. हा डेपो फक्त गाड्यांच्या देखभालीपुरता मर्यादित राहणार नाही, तर दादर येथून सुटणाऱ्या नव्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी एक मोठं हब बनणार असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंग यांनी सांगितलं.
1. जागेची टंचाई - सध्या मुंबई सेंट्रल व दादर टर्मिनसवर गाड्यांच्या पार्किंग, स्वच्छता, तांत्रिक तपासणीसाठी जागेची खूप कमतरता आहे.
2. मागणी असूनही अडचण - त्यामुळे प्रवाशांची मोठी मागणी असूनही पश्चिम रेल्वेला दादरहून नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणं शक्य होत नव्हतं.
3. आता मार्ग मोकळा - हा नवा डेपो झाल्यावर ही अडचण दूर होणार आहे.
1. जागा कुठली - करीरोड येथील मध्य रेल्वेच्या 'जनरल स्टोअर डेपो'ची 55,000 चौरस मीटर जागा ठाकुर्लीला हलवून तिथे पश्चिम रेल्वेचा हा डेपो उभा राहणार आहे.
2. खर्च किती - जवळपास 98 कोटी खर्च करून दोन टप्प्यांत हा डेपो उभारला जाणार आहे.
3. काम कधी पूर्ण होणार - या डेपोचं काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवलं.
1. एकूण 10 मार्गिका - या डेपोमध्ये एकूण 10 रेल्वे मार्गिका असणार आहेत.
2. 2 पिट लाईन्स - यात 600 मीटर लांबीच्या दोन खास 'पिट लाईन्स' असतील.
3. 6 पार्किंग लाईन्स - 6 पार्किंग लाईन्समुळे एकाच वेळी 'वंदे भारत एक्स्प्रेस'सारख्या दोन पूर्ण लांबीच्या गाड्यांची दुरुस्ती व देखभाल करणं शक्य होणार आहे.
4. ताण कमी होणार - हा डेपो सुरू होताच मुंबई सेंट्रल डेपोवरचा ताण खूप कमी होईल.
1. दादरवरून 5-6 नव्या गाड्या - परिणामी, दादर स्थानकावरून दररोज किमान 5 ते 6 जास्तीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
2. एकूण 10-15 नव्या गाड्या - तसेच, ब्रिटिशकालीन ग्रँट रोड पार्सल डेपोच्या पुनर्विकासाचा प्रकल्पही याला जोडला गेल्याने मुंबईतून एकूण 10 ते 15 नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या धावू शकणार आहेत.
पुढच्या काही वर्षांत मुंबईकरांना लांबच्या प्रवासासाठी गाड्यांचे जास्त ऑप्शन मिळणार आहेत, आणि तिकीट मिळायला पण थोडी सोय होईल.