मुंबई : काेराेनाने (Corona) गेली दाेन वर्षे शाळा बंद हाेत्या. मुलांना शिक्षण मिळाले नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे मुंबई पालिकेच्या (BMC) शिक्षण विभागाने (Education Department) आता डिजिटल क्रांती (Digital Revolution) करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका शाळांतील १३०० वर्ग खाेल्या डिजिटल करण्यात येणार असून ४८० वर्ग खाेल्यांचे व्हर्च्युअल क्लासरूममध्ये (Virtual Classroom) रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
काेराेनाच्या काळात शिक्षण व्यवस्था ठप्प झाली हाेती. शाळा बंद हाेत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यामुळे शिक्षण विभागाला जाग आली असून डिजिटल शिक्षण पध्दतीचा अधिक अवलंब करण्यावर भविष्यात भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी यंदा ४८० वर्ग खाेल्यांचे व्हर्च्यअल क्लासरूममध्ये रुपांतर करण्यात येणार असून आधुनिकरणाच्या प्रक्रियेसह निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाेबतच १३०० वर्ग खाेल्या डिजिटल करण्यात येणार आहे. डिजिटल शिक्षणाचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर आता भर देण्यात आला असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
पालिकेच्या ११२ संगणक प्रयाेगशाळांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ५० शाळांमध्ये प्रायाेगिक तत्वावर ई वाचनालय तसेच १०३ शाळांची दर्जाेन्नती हाेणार आले. शाळांच्या दुरूस्तीची कामे वेगाने करण्यात येणार असून त्या दृष्टीने वेगाने काम सुरू असल्याचे समजते.