
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण (Sharad Pawar Tested Corona Positive) झाली आहे. पवार यांनी ट्विट (Sharad Pawar Tweet) करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. — Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
[read_also content=”दिल्लीतल्या कामाच्या जोरावर इतर राज्यातल्या मतदारांना मतदानासाठी साद, आपचं ‘एक मौका केजरीवाल को’ कॅम्पेन लाँच https://www.navarashtra.com/assembly-election-2022/delhi-chief-minister-arvind-kejriwal-launched-ek-mauka-kejriwal-ko-campaign-nrsr-227055/”]
आपल्या ट्विटमध्ये शरद पवार यांनी म्हटलं आहे की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.’
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांमधले अनेक प्रमुख नेते कोरोनाबाधित झाले होते. यात पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील अशा अनेकांचा समावेश आहे. यातले काहीजण कोरोनामुक्त झाले आहेत.