पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसने विरोध केला आहे.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले.
[read_also content=”तर, तुमचं काही खरं नाही…पुतीनची युक्रेनला धमकी, तर झेलेन्स्कीही अडून, म्हणतो ‘झुकेगा नहीं साला’ https://www.navarashtra.com/world/putin-threatens-ukraine-but-volodymyr-zelensky-refuse-to-surrender-nrps-249913.html”]