
महाराष्ट्राला दोन ‘वंदे भारत’ स्लीपर मिळणार
मुंबई : ‘वंदे भारत ट्रेन’ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादानंतर आता रेल्वेच्या ताफ्यात ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ लवकरच दाखल होणार आहे. ‘वंदे भारत स्लीपर’मुळे प्रवाशांच्या वेळेत बरीच बचत होणार असून, ही ट्रेन सुरू होण्याचा पहिला टप्पा मुंबईत बुधवारी पार पडला. अहमदाबाद ते मुंबई मार्गावर ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ची ट्रायल रन घेण्यात आली.
हेदेखील वाचा : महाराष्ट्राला दोन ‘वंदे भारत’ स्लीपर मिळणार; नागपूर-पुणे, नागपूर-मुंबई मार्गावर धावणार रेल्वे
भारताची नव्या रुपाची प्रीमियम ट्रेन म्हणून ओळखली जाणारी ‘वंदे भारत’ आता लवकरच धावण्यास सज्ज होणार आहे आणि तिची चाचणी सध्या सुरू आहे. ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ आता स्लीपर बर्थच्या रुपात येणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना आता प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी अंतिम टप्प्यात असून, चाचणी दरम्यान तब्बल 130 किमी प्रति तास वेगाने वंदे भारत स्लीपर अहमदाबाद ते मुंबई धावली.
लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार
‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुपरफास्ट असल्याने कमी वेळात जास्त अंतर गाठते. ट्रेनमध्ये फक्त केबल चेअर बसल्याने फक्त बसूनच प्रवास करावा लागत होता. सहा ते सात तासांच्या प्रवासात बसून-बसून पाय दुखणे किंवा पाठदुखी होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यामुळे रेल्वेने वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसची घोषणा केली होती. या ट्रेनमुळे लांब पल्ल्यांचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होणार आहे. वंदे भारत स्लीपरचा चाचणी अंतिम टप्प्यात आहे.
ट्रेनमध्ये काय असेल खास ?
या ट्रेनमध्ये आरामदायी बर्थ, स्वच्छ आणि आधुनिक टॉयलेट्स, हाय स्पीड वाय- फाय, रीडिंग लाइट्स आणि हाय स्पीड मोबाईल चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या सुविधा असतील. ही ट्रेन लवकरच रुळांवर पूर्णपणे उतरवण्यात येणार असून काही मार्गावर ती धावणार आहे
जानेवारी अखेर ‘वंदे भारत स्लीपर’ सुरू होणार
‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनचा मार्ग अद्याप समोर आलेला नाही. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकातादरम्यान चालवली जाऊ शकते. यासाठी ट्रेनची ट्रायल घेतली जात असून, त्यात ताशी १६० ते १८० किलोमीटर वेगाने ट्रेन चालवली जात आहे. जानेवारी अखेर ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
हेदेखील वाचा : ‘वाल्मिक कराडकडून शेतकऱ्यांची फसवणूक, ईडीने नोटीस बजावली पण कारवाई नाहीच’; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल