• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Municipal Commissioner Naval Kishore Ram Ordered An Inspection Of Voter Lists

Pune Municipal Voter List : मतदार यादीवर अदृश्य हात कोणाचा? हेराफेरी केल्याचे आरोप

पुणे महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग निहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरू आहे. या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ घालण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2025 | 03:30 PM
मतदार यादीवर अदृश्य हात कोणाचा? हेराफेरी केल्याचे आरोप

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुणे महापालिकेची निवडणूक लवकरच होणार
  • मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ घातल्याचा आरोप
  • मतदार याद्यांची तपासणी करण्याचे आयुक्तांचे आदेश
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग निहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरू आहे. या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ घालण्यात आला आहे, महापालिका प्रशासन जी यादी तयार करण्याचे काम करत आहे त्या यादीमागे काही अदृश्य हाताने हेराफेरी केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. त्यामुळे हे अदृश्य हात नेमके कोणत्या पक्षाचे आहेत याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

मतदार यादीमध्ये घोळ असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून शेजारील प्रभागातील अनुकूल मते आपल्या प्रभागात ओढण्यात आल्याची आणि प्रतिकूल मते दुसऱ्या प्रभागात ढकलण्यात आल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांपर्यंत आल्या आहेत. त्या पार्श्वभूमी वरती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मतदार याद्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत.

पालिकेची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे यानंतर हरकती आणि शहानिशा केल्या जाणार आहेत. हरकती शहानिशा नंतर अंतिम मतदार यादी तयार केली जाणार आहे मात्र त्या अगोदरच मतदार यादीमध्ये प्रचंड गोंधळ असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. यादी तयार करण्यासाठी घालून दिलेले नियम मोडून मनमानी पद्धतीने यादी तयार केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. यादीमध्ये बाहेरील राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय वाढत चालला आहे.

राज्य निवडून आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग निहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरू आहे. महापालिकेची सुमारे 36 लाख मतदार संख्या 41 प्रभागांनुसार विभागातून मतदार यादीचे काम सुरू आहे यासाठी दोन उपायुक्त यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

मतदार यादी विभाजनात हस्तक्षेप

मतदार यादी विभाजन प्रक्रिया राजकीय हस्तक्षेप झाल्याचे तक्रारी येत आहेत. सत्ताधारी पक्षातील काही इच्छुकांनी अनुकूल असलेले शेजारच्या प्रभागातील मतदार आपल्या प्रभागात तर प्रतिकूल मतदारांची नावे इतर प्रभागात ढकलण्याचा आरोप करण्यात येत आहे.

मतदार यादी पडताळणीचा निर्णय

आयुक्तांकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मतदार यादी विभाजनाच्या कामाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पदाधिकाऱ्यांत नाराजी

सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशी मतदार यादी बनवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांत नाराजी पसरली आहे.

आयुक्तांनी घेतली दखल

मतदार यादी तयार करण्यासाठी आयुक्तांनी दोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. मतदार यादीतील घोळाला आयुक्तांनी अप्रत्यक्षरीत्या सहमती दर्शवली असली तरी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याचा संदेश दिला आहे.

Web Title: Municipal commissioner naval kishore ram ordered an inspection of voter lists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही; ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा
1

धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही; ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली
2

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

PMPML च्या ज्युनिअर क्लार्क भरतीला स्थगिती मिळणार? काँग्रेसने केली ‘ही’ मागणी
3

PMPML च्या ज्युनिअर क्लार्क भरतीला स्थगिती मिळणार? काँग्रेसने केली ‘ही’ मागणी

Baramati : मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, नाहीतर…; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन
4

Baramati : मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, नाहीतर…; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BMC Politics : मुंबईमध्ये शरद पवारांनी फिरवली भाकरी; राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंना सोडून दिली महायुतीला साथ

BMC Politics : मुंबईमध्ये शरद पवारांनी फिरवली भाकरी; राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंना सोडून दिली महायुतीला साथ

Feb 06, 2026 | 04:31 PM
CSMIA Mumbai Update: मुंबई विमानतळावर ‘सेल्फ बॅग ड्रॉप’ सुविधा सुरू; प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवासाचा वेग वाढणार

CSMIA Mumbai Update: मुंबई विमानतळावर ‘सेल्फ बॅग ड्रॉप’ सुविधा सुरू; प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवासाचा वेग वाढणार

Feb 06, 2026 | 04:28 PM
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत संशयांची साखळी; श्रीकलाचं बिंग फुटणार, पोपटरावांचा धक्कादायक हस्तक्षेप

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत संशयांची साखळी; श्रीकलाचं बिंग फुटणार, पोपटरावांचा धक्कादायक हस्तक्षेप

Feb 06, 2026 | 04:27 PM
Devgadh Mango Farmers: देवगडच्या आंबा बागायतदारांवर १० वर्षांतील सर्वात मोठे अरिष्ट; पालकमंत्री नितेश राणेंना साकडे

Devgadh Mango Farmers: देवगडच्या आंबा बागायतदारांवर १० वर्षांतील सर्वात मोठे अरिष्ट; पालकमंत्री नितेश राणेंना साकडे

Feb 06, 2026 | 04:26 PM
SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!

SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!

Feb 06, 2026 | 04:16 PM
घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

Feb 06, 2026 | 04:09 PM
RAW-IB प्रमाणेच परदेशात तैनात असतात भारताचे ‘COIN’ एजंट; जाणून घ्या DRI च्या या रहस्यमय युनिटबद्दल

RAW-IB प्रमाणेच परदेशात तैनात असतात भारताचे ‘COIN’ एजंट; जाणून घ्या DRI च्या या रहस्यमय युनिटबद्दल

Feb 06, 2026 | 04:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.