मुंबई : आज मुंबई क्रिकेट असोसिएशनची (Mumbai Cricket Association Election) निवडणुक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (बुधवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DC Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, विरोधक व सत्ताधारी एकाच मंचावर येणं हे खूप कमी वेळा घडतं. कालच्या कार्यक्रमात पवार, शिंदे व फडणवीस यांनी जोरदार टोलबाजी केली तसेच ऐकमेकांस चिमटे सुद्धा काढले. दरम्यान, काल मंचावर शरद पवारांनी आपली शिंदे यांच्यासोबत सोयरिक कशी आहे, याचा किस्सा सांगितला.
[read_also content=”दिवाळीच्या पाकिटावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पंतप्रधानांचे फोटो कशाला? अंबादास दानवेंचा सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/why-photos-of-cm-dcm-and-pm-on-diwali-envelope-ambadas-danve-337836.html”]
दरम्यान, शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे पाहून हातवारे करुन माझे सासरे शिंदेच होते. असं म्हटलं आणि सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडात झाला. “माझे सासरे शिंदेच… आणि शिंदेंची मुलगी शरद पवारांची बायको आहे. त्यामुळे शिंदेंना आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याचा गांभीर्यानं विचार करावा, अशी विनंती करतो.” असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. शिंदे घराण्याशी आपला खूप जवळचा संबंध आहे. सासरी गेलो की, शिंदे आपणाला खूप आदर द्यायचे. शरद पवारांनी आपले शिंदे यांच्याशी कसं नातं आहे, हे मुख्यमंत्र्यांना सांगितले. तेव्हा सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.






