Mahayuti News: काल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आज शिंदे अचानक दिल्लीला गेल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
सत्तेसाठी लाचारी बाळगण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आमदारांना खूप काही देत असत. त्यावेळी त्यांनी भाजपला काहीही दिले नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली.
येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी (शरद पवार) सोबत हातमिळवणी केली, तेव्हा महायुती आघाडीतील दुफळी दिसून आली. आता ही लढत भाजप-अजित पवार गटाविरुद्ध असेल, अशी चर्चा रंगू लागली…
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेची प्री-कॅबिनेट बैठक झाली. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र एकनाथ शिंदे यांना वगळता शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नव्हता.
शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोघेही एकत्र उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकप्रिय शिल्पकार राम सुतार यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या नोएडातील निवास्थानी करण्यात आला.
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत १२८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत.
Local Body Elections: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
Maharashtra Local Body Election: पक्षाने राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली असून यात शिवसेना मंत्री खासदार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अण्णा हजारे यांच्या भेटीबाबत सांगताना एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर म्हटले की, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून, इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यासंदर्भात मागणी करणारे निवेदन दिले.
बिबट्यांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मोहीम सुरू आहे आणि आता तातडीने ही मोहीम व्यापक करून या भागातील सर्व बिबटे पकडून त्यांना स्थलांतरित करावेत असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात…
पारनेर येथील आयोजित मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुजित झावरे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. तसेच यावेळी शिंदेनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे विधान केले.
शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा येथील कार्यक्रमात आक्रमकपणे शिवसेनिकांच्या पाठिशी उभे राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. देसाईंच्या या बुस्टर डोसने जावली तालुक्यातील शिवसेना चांगलीच चार्ज झाली आहे.