नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय (Nagpur RSS Headquarters) परिसराची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला नागपूर एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. नागपूर दहशतवादी पथकानं काश्मिरमध्ये जाऊन रईस शेख या दहशतवाद्याला अटक केली आहे.
जानेवारी महिन्यात रईस अहमद शेख सदाउल्ला शेख याला काश्मिर पोलिसांनी अटक केली होती. 15 जुलै 2021 रोजी नागपुरात येऊन रईस शेखने संघ मुख्यालय, स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर नागपुरात कोतवाली पोलिसांनी रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर काश्मिरला जाऊन नागपूर एटीएसने त्याला ताब्यात घेतला. दहशतवादी रईस शेखची सध्या एटीएसकडून कसून चौकशी सुरु आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून रईस अहमद असादउल्ला शेखचा ताबा प्रोडक्शन वॉरंटवर घेण्यात आला आहे.
[read_also content=”27 मेपर्यंत केरळमध्ये तर महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून होणार दाखल! Navarashtra News Network Navarashtra News Network https://www.navarashtra.com/maharashtra/monsoon-will-start-in-kerala-till-may-27-and-in-maharashtra-from-june-7-to-june-8-nrps-281290.html”]