फोटो सौजन्य सोशल मीडिया
Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई
सण उत्सवांमधील डीजेच्या वापरावरून शहरात वेगवेगळ्या भूमिका समोर येत असताना
रविवारी पश्चिम नागपुरात एकीकडे डीजेमुक्त तर दुसरीकडे डीजेसह उत्त्सवी वातावरण पाहायला मिळाले. पश्चिम नागपुरात भाजयुमोने डीजेमुक्त दहीहंडी उत्सव साजरा केला तर त्याच परिसरात विश्व हिंदू परिषदेकडून डीजेसह कृष्ण जन्माष्टमी शोभायात्रा काढली.
Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी
पश्चिम नागपूर भाजयुमोच्यावतीने लक्ष्मीभुवन चौकात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार संदीप जोशी यांच्या हस्ते ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचे पूजन झाल्यानंतर भजन, जॅमिंग आणि ढोल-ताशा पथकाच्या सादरीकरणाने उत्सव साजरा करण्यात आला.
‘मिर्झापूर’ फेम दिव्येंदू यांची विशेष उपस्थिती आकर्षण ठरली. अक्षय शर्मा, उदय मिश्रा, सौरभ साहू यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याने नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत केले.
Nagpur News : बनावट इंजिनीअरिंग प्रवेशाचा पर्दाफाश; २ प्रवेश रद्द
पश्चिम नागपुरातील गिट्टीखदान येथून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कृष्ण जन्माष्टमीची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत डीजे लावलेल्या एकापेक्षा अधिक वाहनांचा समावेश होता. गौरक्षणपर्यंत निघालेल्या शोभायात्रेत विहिंपचे कार्यकर्ते दुचाकी रॅलीद्वारे सहभागी झाले.
मार्गावर डीजेवर संगीत सुरू होते. मात्र, पोलिसांचे पथक ध्वनिक्षमतेची तपासणी करणाऱ्या यंत्रांसह शोभायात्रेसोबत होते. त्यामुळे डीजेच्या आवाजावर निर्धारित नियमांनुसार नियंत्रण ठेवले. एकाच भागात एका बाजूला डीजेमुक्त दहीहंडी तर दुसरीकडे डीजेसह शोभायात्रा निघाल्याने डीजेच्या वापरावरून सुरू असलेली वेगवेगळी मते पुन्हा चर्चेत आली.






