नागपूर : मागच्या महिन्याच्या तुलनेत नागपुरातील कोरोना बाधितांची संख्या या महिन्यात वेग धरत आहे. शहरात गुरुवारची बाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्याच तुलनेत शुक्रवारी बाधितांची संख्या कमी झाली आहे. काळजीची बाबा अशी, गेल्या दोन दिवसांत नागपूर शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत चार बळी तर, चोवीस तासांत तीन लोकांनी आपला जीव गमावला आहे.






