केळघर : केळघर परिसरात गेले चार ते पाच दिवस फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून या मुसळधार पावसाचा फटका नांदगणे ते पुनवडी दरम्याणच्या पुलाला बसला असून या पुलाचा भराव वाहून गेल्याने या पुलावरून होणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे .
केळघर परिसरात फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असून वेण्णा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे .
परिसरातील ओढ्या नाल्यांना पुराचे स्वरूप आले असून वेण्णा नदीपात्रा वरील नांदगणे ते पुनवडी दरम्यान च्या पुलाचा भराव वाहून गेल्याने बोंडारवाडी , भुतेघर, बाहुळे, तळोशी, वाळंजवडी, केडंबे, पुनवडी येथील नागरीकांना केळघर किंवा मेढा या प्रमुख बाजारपेठेत जाण्यासाठी डांगरेघर ते आंबेघर मार्गे प्रवास करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थी , प्रवाशांसह अबाल वृद्धांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.