MNS Raj Thackeray aggressive on Hindi language mandatory in state school curriculum
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे तीन दिवसीय दौऱ्यासाठी नाशिकमध्ये आले होते. पण हा दौरा एकाच दिवसात संपवून ते ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे त्यांनी हा दौरा अर्धवट का सोडला असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यात नाशिकमधील विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्या आश्वासनांमुळे आणि चर्चेमुळे मनसेतील गळती थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघटनात्मक स्थिती सुधारण्यासाठी ते नवीन उपायांची अंमलबजावणी करण्याचा विचार करत आहेत. मुंबईला परत जाण्याआधी राज ठाकरे यांनी मनसेचे सचिव सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आणि दिनकर पाटील यांच्यासोबत जवळपास पाऊण तास चर्चा केली. त्यात त्यांनी मनसेच्या उद्देशाचा आणि दृष्टिकोनाचा परिपूर्ण विचार केला, तसेच पदाधिकाऱ्यांना समाजाच्या हितासाठी परिश्रम घेण्याचे महत्त्व सांगितले.
रामदास आठवलेंची भाजपकडे मोठी मागणी; म्हणाले, पुण्याचे महापौरपद अन्
काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याबाबत आदेश दिला. पण मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा मनसेनेच हाती घेतला होता. याची आठवण करून देत समाजातील अथवा जनतेसमोरील कोणताही प्रश्न असो, तो सोडवण्याची आशा आणि अपेक्षा लोकांना प्रामुख्याने मनसे आणि राज ठाकरे यांच्याकडूनच असते, असेही त्यांनी नमुद केले.
नाशिक शहरातील नागरिक अनेक समस्यांचा सामना करत आहेत. विशेषतः शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने या प्रकरणात गोंधळ निर्माण केला आहे, आणि त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राधान्याने हाताळला पाहिजे.
‘पाहता तुला मी वरले’, सईच्या क्लासी स्टायलिश लुकने चाहत्यांच्या हृदयावर थेट वार
नाशिकमधील समस्यांचे समाधान करण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहावे, नागरिकांच्या तक्रारी ऐकाव्यात आणि त्यावर कार्यवाही करावी. जर हे प्रभावीपणे केले, तर मनसेला पुन्हा एकदा लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची संधी मिळेल, असा राज ठाकरे यांचा विश्वास आहे.
याशिवाय, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ठोस आणि प्रभावी उपाय सुचवले आहेत. निवडणुकीत मनसेला ठोस कामगिरी दाखवावी लागेल, अशी स्पष्ट जाणीव राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात जाणवली. त्याचबरोबर त्यांनी नाशिकसह राज्यातील पदाधिकारी संघटनेत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या दौऱ्यानंतर नाशिकमधील मनसेचे पदाधिकारी किती सक्रिय होतात आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्नशील राहतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.