नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातील उमदेवार नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. समीर खान यांच्या निधनाने खान आणि मलिक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काही दिवसांपूर्वी समीर खान यांचा कुर्ला येथे भीषण अपघात झाला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. समीर खान यांचं रविवारी निधन झाल्याची माहिती स्वत: नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली. त्यांच्या निधनाने मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे नवाब मलिक यांनी काही दिवसांचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.
Inna lillahi wa inna ilayhi raji’un.
My son-in-law, Sameer Khan, has passed away. May Allah grant him the highest place in Jannah. As we mourn this loss, all my scheduled for the next two days are postponed. Thank you for your understanding, Please keep him in your prayers.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2024
काही दिवसांपूर्वी समीर खान मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालायून नियमित तपासणी करून घरी परतत होते. मात्र कारमध्ये बसत असताना कारचालकाने अॅक्सिलेटर दाबला. त्यामुळे समीर खान कारसोबत फरफटत गेले आणि कार थेट समोरच्या भिंतीला आदळली. यावेळी कारने पाच दुचाकींनाही धडक दिली. या अपघातात समीर यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांना उपचारासाठी तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. निलोफर खान यांच्या हाताला देखील दुखापत झाली होती. अपघात झाल्यानंतर समीर खान यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अपघातानंतर समीर खान यांचा कार चालवणारा चालक अब्दुल अन्सारी याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं होतं.
दरम्यान आज उपचारादरम्यान समीर खान यांचा मृत्यू झाला आहे. नवाब मलिक यांनी याची स्वत: माहिती दिली.