Unauthorized three schools in the district notice from the Department of Education found in the survey
मुंबई- नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता, मंगळुरू, सिंधुदुर्ग व ठाणे येथील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मार्फत, ‘चलो, स्कूल चलें’ हे विशेष अभियान, सुरू केले आहे. मुंबईतील आगरकर नाइट स्कूल व वरळी नाइट स्कूल, येथून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आणि आता शहापूर, पालघरसारख्या निमशहरी भागांत हे अभियान पोहोचणार आहे. त्यानंतर आणखी काही शहरांमध्ये पोहोचण्याचीही अभियानाची योजना आहे.
या अभियानाअंतर्गत, एनएसडीएल वंचित समुदायांतील विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असे स्कूल किट पुरवणार आहे. ते 10 इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन एनएसडीएल ने हे किट खास बनवले आहे. यात दप्तर, वह्या, कंपास बॉक्स, पेन्सिल इत्यादी आवश्यक साहित्याचा समावेश आहे.
लाभार्थींविषयी:
निम्न सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील पात्र विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी एनएसडीएल प्रयत्नशील आहे. सरकारी शाळा, विनाअनुदानित तसेच अंशत: अनुदानित शाळा तसेच समुदायाधारित संस्था/ट्रस्ट/ वाभावी संस्था यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांना या अभियाना अंतर्गत मदत केली जाणार आहे. लाभार्थी शाळा व विद्यार्थ्यांची यादी करताना विद्यार्थ्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी विचारात घेतली जाते.
एनएसडीएल विषयी:
एनएसडीएल (www.nsdl.co.in) ही भारतातील पहिली आणि जगातील आघाडीच्या सेंट्रल सिक्युरिटी डिपॉझिटरी पैकी एक आहे. अभौतिक स्वरूपात सिक्युरिटीची धारणा व हस्तांतर सुलभ करून भारतीय बाजाराचे रूपांतरण घडवून आणण्यात एनएसडीएल ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एनएसडीएल चा अभौतिक स्वरूपातील संपत्ति मूल्यातील बाजारातील वाटा 89 टक्क्यांहून अधिक आहे. एनएसडीएल डिमॅट खातेधारक देशातील 99 टक्के पिनकोड्मध्ये आहेत आणि जगभरातील 189 देशांत आहेत. यातून एनएसडीएल ची व्याप्ती लक्षात येते.