मुंबई – दीड दोन महिन्यांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला, त्यानंतर रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प देखील राज्याबाहेर गेला होता. त्यानंतर आता टाटा एअरबसचा विमान निर्मितीचा प्रकल्प (Tata Airbus Project) सुद्धा राज्याबाहेर गेला आहे. त्यामुळं विरोधक आक्रमक झाले असून, विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, आरटीआयमध्ये चुकीची माहिती देत आहेत. वेदांत प्रकल्पासाठी मविआ सरकारने सर्व प्रयत्न केले, त्याची माहिती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत बैठक घेतली होती. त्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. एकप्रकारे मविआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच वेदांता प्रकल्पावरून सरकार भ्रम निर्माण करतेय, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
[read_also content=”जयवर्धनेला मागे टाकत कोहलीचा ‘विराट’ विक्रम! भारताचे बांग्लादेशपुढे १८५ धावांचे आव्हान https://www.navarashtra.com/sports/india-challenge-of-one-hundred-eight-five-runs-against-bangladesh-341198.html”]
भारत जोड़ो आंदोलन
भारत जोडो यात्रा जेव्हा संपेल तेव्हाच कळेल यात कोण कोण सहभागी झाले. या यात्रेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील. लवकरच याबाबत स्पष्टता समोर येईल, यात कोण कोण सहभागी होणार आहे ते, सत्ताधार्यांना जे काही बोलायच ते बोलू द्या.
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटिस..
भाजप त्यांचं न ऐकणाऱ्या लोकांवर दबावतंत्राचा वापर करत आहे. महाराष्ट्र राज्यात नारायण राणे, प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांच्यावर भाजपने यापूर्वी ईडीच्या कारवाईची मागणी केली होती. झारखंड असो किंवा महाराष्ट्र सर्वांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. जे घाबरत नाही त्यांना थेट जेलमध्ये टाकण्यात येत आहे.
अंधेरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक
या निवडणुकीत भाजपने भीतीने आपला उमेदवार मागे घेतला. आता एक ऑडियो क्लिप समोर आली आहे. यात नोट देऊन नोटाचा वापर करण्यास सांगितले जात आहेत.काही केलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचाच नक्कीच विजय होईल. असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.