Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

23 एप्रिल रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन; एकाच वेळी तब्बल ‘एवढ्या’ ठिकाणी होणार आहे रक्तदान

यावर्षीही मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आणि गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेशात मिळून तब्बल 82 ठिकाणी एकाच वेळी हे महारक्तदान शिबिर पार पडेल. रविवार दिनांक 23 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराची व्याप्ती फार मोठी असेल. मुंबईतूनच सुमारे आठ हजार युनिट इतके रक्तसंकलन केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 22, 2023 | 07:01 PM
23 एप्रिल रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन; एकाच वेळी तब्बल ‘एवढ्या’ ठिकाणी होणार आहे रक्तदान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आपल्या देशात दर दोन सेकंदामागे एकाला रक्तपुरवठ्याची (Blood) गरज भासते. आपल्यातील तीन जणांपैकी दोघांना आयुष्यात एकदा तरी रक्ताची आवश्यकता निर्माण होते. कारण विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी मानवी रक्ताला अजूनही पर्याय मिळालेला नाही. म्हणूनच रक्तदानाचा (Blood Donation) अर्थ जीवनदान असा होतो. आपल्या देशाच्या लोकसंख्येपैकी 60 टक्के रक्तदान करण्यासाठी सक्षम असतात. पण वर्षाकाठी यातले एक टक्का इतकेच रक्तदानासाठी पुढे येतात. त्यामुळे आपल्या देशाला दरवर्षी सुमारे 30 लाख युनिट्स इतकी रक्ताची कमतरता भासते. याच कारणामुळे रक्तदान हा आपल्या कर्तव्याचा भाग ठरतो.

याची जाणीव ठेवून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ‘श्री अनिरूद्ध आदेश पथक’, ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरूद्धाज्‌‍ अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘अनिरूद्ध समर्पण पथक’ या संस्था रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहे. डॉ. अनिरूद्ध जोशी, एम. डी. मेडिसिन (सद्गुरू अनिरुद्ध बापू) यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या या संस्थांनी 1999 सालापासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून आत्तापर्यंत 1.65 लाख युनिट इतके रक्त संकलित केले आहे.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 22 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-22-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

या संस्थांमार्फत यावर्षीही मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आणि गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेशात मिळून तब्बल 82 ठिकाणी एकाच वेळी हे महारक्तदान शिबिर पार पडेल. रविवार दिनांक 23 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराची व्याप्ती फार मोठी असेल. मुंबईतूनच सुमारे आठ हजार युनिट इतके रक्तसंकलन केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या रक्तदान शिबिराचा लाभ जवळपास शंभर रक्तपेढ्या (सरकारी व खाजगी) घेणार आहेत.

याआधी मुंबईत 2019 साली या संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकाच दिवशी मुंबईत सुमारे 8,973 युनिट इतके, तर महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये मिळून 15,937 युनिट इतके रक्तसंकलन करण्यात यश मिळविले होते. हा अनुभव लक्षात घेता 23 एप्रिल रोजीच्या महारक्तदान शिबिरालाही प्रचंड प्रतिसाद मिळेल. त्याची पूर्वतयारी या संस्थांच्या स्वयंसेवकांनी केलेली आहे.

Web Title: Organized blood donation camp on april 23 blood donation will be done in 82 places at the same time nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2023 | 06:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.