Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय हरित लवादाने तारापूर एमआयडीसीतील उद्योगांना ठोठावला २८० कोटींचा दंड, प्रदूषणविषयक याचिकेवर झाली सुनावणी

तारापूर परिसरात २००५ पासून झालेल्या प्रदूषणाचा (Pollution In Tarapur MIDC) आढावा घेत दंडात्मक मापदंडामध्ये वाढ केल्याने दंडाची (Fine Imposed On Companies Of Tarapur MIDC) रक्कम २८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) पर्यावरण रक्षणात अपयशी ठरल्याने तसेच आवश्यक उपाययोजना न आखल्याने दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • By साधना
Updated On: Jan 26, 2022 | 08:15 PM
tarapur midc

tarapur midc

Follow Us
Follow Us:

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील (Tarapur MIDC) उद्योगांकडून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या माध्यमातून विविध जलस्रोतांमध्ये झालेल्या प्रदूषणामुळे (Water Pollution By Companies Of Tarapur MIDC) राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) ९९ उद्योग व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला सुमारे २८० कोटींचा दंड ठोठावला आहे.

अखिल भारतीय मांगेला समाज परिषद व काही स्थानिकांनी तारापूर औद्योगिक वसाहतीमधून होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे सन २०१६ मध्ये याचिका दाखल केली होती. यामध्ये नाले, खाडी व समुद्रामध्ये विनाप्रक्रिया सांडपाणी सोडणे तसेच जलस्त्रोत प्रदूषित करण्याचे आरोप करण्यात आले होते. या जलप्रदूषणामुळे परिसरातील १६ ते २० गावे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बाधित होऊन मासेमारीच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचे नमूद केले होते. तसेच रासायनिक सांडपाण्यामुळे त्वचारोग, कर्करोग व इतर आजारांनी बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचा याचिकेत उल्लेख होता.

यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाने सुनावणीदरम्यान प्रदूषणामुळे झालेल्या पर्यावरणाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी तसेच पर्यावरण जिर्णोद्धारासाठी २०१९ मध्ये येथील उद्योगांना १६० कोटी रुपयांची दंडात्मक रक्कम आकारण्यात आली होती. याबाबत काही उद्योगांनी हरित लवादाकडे फेरविचार अपील दाखल केल्यानंतर दंडात्मक रकमेत काही फेरबदल करून १६० कोटी रुपयांची एकूण रक्कम मात्र कायम ठेवली होती. दंडात्मक रकमेच्या बाबत उद्योजकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान करोना काळात राष्ट्रीय हरित लवादाच्या मुख्य खंडपीठापुढे या याचिकेचे ३० सप्टेंबर २०२१ रोजी सुनावणी झाली असता निर्णय राखून ठेवण्यात आला होता. न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल व न्यायमूर्ती ब्रिजेश सेठी यांच्यासह तांत्रिक सल्लागार नगीन नंदा यांच्या खंडपीठाने २४ जानेवारी रोजी या याचिकेचा निकाल जाहीर केला.

तारापूर परिसरात २००५ पासून झालेल्या प्रदूषणाचा आढावा घेत दंडात्मक मापदंडामध्ये वाढ केल्याने दंडाची रक्कम २८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) पर्यावरण रक्षणात अपयशी ठरल्याने तसेच आवश्यक उपाययोजना न आखल्याने दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title: 280 crore fine imposed to companies of tarapur industrial colony by green tribunal nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2022 | 08:13 PM

Topics:  

  • Tarapur MIDC

संबंधित बातम्या

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?
1

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.