मुंबई : मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणी भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे चौकशीसाठी माता रमाबाई आंबडेकर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. तर, कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली.
राज्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणेंचा चौकशीचा ससेमिरा सुरु असताना, आरोप प्रत्यारोपांचे राजकारण केले जात आहे. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरण आपने चांगलेच लावून धरले आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार मुंबईतील रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात त्यांना आज (सोमवारी) चौकशीला हजर झाले आहेत. मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आम आदम पक्षातर्फे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दिली होती. चौकशीत पोलिसांना सर्व सहकार्य करणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच मागील आठवड्यात आम आदमी पार्टीने प्रवीण दरेकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.
[read_also content=”अमेरिकेतील सॅक्रामेंटो येथे झालेल्या गोळीबारात सहा ठार, १० जखमी https://www.navarashtra.com/world/six-killed-10-injured-in-shooting-in-sacramento-us-nrab-263955.html”]
[read_also content=”ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील थप्पड प्रकरण विल स्मिथच्या अंगाशी आलं, नेटफ्लिक्सनं त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग थांबवलं https://www.navarashtra.com/movies/netflix-has-stopped-shooting-off-will-smiths-upcoming-film-nrps-263925.html”]